कविश्वर, भुस्कुटे विद्यापीठाच्या समित्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:20+5:302020-12-03T04:19:20+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तक्रार निवारण समिती तसेच परिनियम समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन केले आहे. वाणिज्य व ...
Next
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तक्रार निवारण समिती तसेच परिनियम समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन केले आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर यांना तक्रार निवारण समितीवर कुलगुरूंकडून नामनिर्देशित करण्यात आले आहे. तर परिनियम समितीवर गोंदिया जिल्ह्यातील भवभूती महाविद्यालयामधील डॉ. श्रीराम भुस्कुटे यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.