‘केबीसी’च्या २५ लाखांच्या लॉटरीची थाप; महिलेचे सव्वादोन लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 09:12 AM2021-03-24T09:12:02+5:302021-03-24T09:12:20+5:30

Nagpur news ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीची २५ लाखांची लॉटरी लागल्याची थाप मारून सायबर गुन्हेगारांनी एका महिलेचे दोन लाख, १५ हजार रुपये हडपले. मंगळवारी या प्रकरणात कळमणा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

KBC's Rs 25 lakh lottery fraud; Twenty-two lakh of the woman was looted | ‘केबीसी’च्या २५ लाखांच्या लॉटरीची थाप; महिलेचे सव्वादोन लाख हडपले

‘केबीसी’च्या २५ लाखांच्या लॉटरीची थाप; महिलेचे सव्वादोन लाख हडपले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीची २५ लाखांची लॉटरी लागल्याची थाप मारून सायबर गुन्हेगारांनी एका महिलेचे दोन लाख, १५ हजार रुपये हडपले. मंगळवारी या प्रकरणात कळमणा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

वर्षा अविनाश खडसे (वय ३९) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या न्यू ओमनगर, भरतवाडा मार्गावर राहतात. २ फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता त्यांना एका सायबर गुन्हेगाराचा फोन आला. केबीसी ऑफिस, मुंबई येथून बोलतो, असे सांगून या भामट्याने वर्षा यांना तुम्हाला कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी केली. अधिक माहितीसाठी तुम्ही दिल्ली येथील हरजित सिंग यांच्याशी बोला, असे म्हणत त्याने सिंगचा नंबर दिला. वर्षा यांनी कथित हरजित सिंगसोबत संपर्क साधला. त्याने तुम्हाला लॉटरी लागली. मात्र ती रक्कम मिळविण्यासाठी टॅक्स भरावा लागेल, असे म्हणून वेगवेगळ्या बँकांचे अकाउंट नंबर देऊन २ ते ८ फेब्रुवारीदरम्यान वर्षा यांना एकूण दोन लाख, १५ हजार रुपये जमा करण्यास बाध्य केले. एवढे करूनही आरोपी पुन्हा पैशाची मागणी करीत असल्यामुळे वर्षा यांना शंका आली. ‘लॉटरीचे नकोत; मला माझे पैसे परत करा,’ असे त्यांनी म्हटले. तेव्हापासून आरोपींनी त्यांच्यासोबत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी मंगळवारी कळमणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: KBC's Rs 25 lakh lottery fraud; Twenty-two lakh of the woman was looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.