मुलांना शाळेत पाठविताय? स्कूल बॅगेत 'या' वस्तू ठेवायला विसरू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 04:12 PM2021-12-01T16:12:36+5:302021-12-01T17:02:02+5:30
नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे.
नागपूर : शहरात अजूनही १ ते ७ च्या शाळा सुरू झाल्या नाहीत. पण ८ ते १२ चे वर्ग सुरू झाले आहे. मात्र ग्रामीणमध्ये आता १ ते १२ चे सर्वच वर्ग प्रत्यक्षात सुरू झाले आहे. नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. शिक्षण विभाग शाळांकडून त्या पूर्णही करून घेईल. पण पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे.
सॅनिटायझर
शालेत सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. शाळेत सॅनिटायझर असेल नसेल पण मुलांच्या सोबत त्याच्या स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझरची बॉटल नक्कीच पाठवा आणि मुलांना सॅनिटायझर वापरण्याची सवय करा.
एक मास्क तोंडाला, दुसरा बॅगेत
विद्यार्थ्यांना शाळेत मास्क अत्यावश्यक केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आता दोन मास्क ठेवावे लागणार आहे. एक मास्क विद्यार्थ्यांच्या तोंडाला तर दुसरा स्कूल बॅगेत ठेवावा लागणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शाळेने पालकांना सूचना केल्या आहेत.
डबा शेअरींग बंद
शाळांमध्ये पूर्वी डबा खायची सुट्टी होती. परंतु शासनाने कोरोनाची खबरदारी लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतला. शाळेचा कालावधी ३ ते ४ तासांचा ठेवला आहे. त्यात डबा खाण्याची सुट्टी बंद केली आहे. याबाबतच्या सूचना आरोग्य विभागानेही केल्या आहेत.
सर्दी, डोकेदुखी असेल तर शाळेला बुट्टी
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्दी, डोकेदुखी, ताप असल्यास त्यांनी शाळेत जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण व आरोग्य विभागाने केल्या आहेत. तरीही पालकांनीही व शिक्षकांनीही त्यांना शाळेत पाठविण्यासाठी अथवा येण्यासाठी आग्रह धरू नये.
प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहार सेवन करणे आवश्यक आहे. हिरव्या ताज्या पालेभाज्या कडधान्य तसेच अंडीचा आहारात समावेश असावा. नियमित व्यायाम, योगासने केल्याने आरोग्य चांगले राहून रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉ. संदीप मोगरे, बालरोग तज्ञ
दिवसातून एकदा प्राणायाम हवाच
नियमित प्राणायाम केल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवसातून एकदा प्राणायाम करणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.