‘समस्यांवर बोट ठेवा, आवाज बुलंद करा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:16+5:302021-07-07T04:09:16+5:30
- सिटिझन्स फोरमने शासन-प्रशासनाचे वेधले लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कचऱ्याचे ढिसाळ नियोजन, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांतील घाण अशा ...
- सिटिझन्स फोरमने शासन-प्रशासनाचे वेधले लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कचऱ्याचे ढिसाळ नियोजन, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांतील घाण अशा विविध समस्यांना उजागर करता शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने सोमवारपासून ‘समस्यांवर बोट ठेवा, आवाज बुलंद करा’ अभियानास सुरुवात केली आहे.
सोमवारी उत्तर, मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरात हे अभियान राबविण्यात आले. शहराच्या ज्या परिसरात समस्या आहेत, तेथे बोट दाखवत लक्ष वेधणे, हा उपक्रम होता. पावसाळ्याच्या तोंडावर साफसफाई करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये अजूनही कचऱ्याचा ढीग साचला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याने ही समस्या दरवर्षी उद्भवत असते आणि ती अपघाताला कारक ठरते. काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या मेन होलचे झाकण उघडे आहे. अशा अनेक समस्यांकडे बोट दाखवत शासन-प्रशासनाला आरसा दाखविण्यात आला.
या अभियानात अमित बांदूरकर, अभिजित सिंह चंदेल, अभिजित झा, वैभव शिंदे पाटील, गजेंद्र सिंग लोहिया, रूपेश चौधरी, कमलेश उमाळे, प्रांजल लोखंडे, संकेत महल्ले, तेजस पाटील, गौरव ठाकरे, गौरव कुंभारे, प्रणय गुणरकर, सत्यम निमजे, श्रेयस गांजरे, जयेश सिंह ठाकूर, रोहित कुंभारे, राहुल वानखेडे, आयेशा मानके, आशिष पाटील, पूजा ढेंगरे, प्राजक्ता इंगळे, नेहा वहाने, आदित्य चौधरी, हर्ष मते, मिहिर पेलने, अभिषेक गोहाने, स्वरूप मेश्राम, शुभम फाले, सेजल हाडके, सोनाली हाडके, प्रांजल लोखंडे हे सदस्य सहभागी होते.
...........