दुहेरी फाशीवरील निर्णय राखून

By Admin | Published: September 30, 2015 06:49 AM2015-09-30T06:49:19+5:302015-09-30T06:49:19+5:30

दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची

Keeping the double execution decision | दुहेरी फाशीवरील निर्णय राखून

दुहेरी फाशीवरील निर्णय राखून

googlenewsNext

नागपूर : दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सादर केले आहे. तसेच, मेश्रामने त्याच्या शिक्षेविरुद्ध अपील केले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंगळवारी या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला.
ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. आरोपी हा संबंधित मुलीचा चुलत मामा असून तो झटाळा ता. घाटंजी येथील रहिवासी आहे. गेल्या १४ आॅगस्ट रोजी यवतमाळ सत्र न्यायालयाने आरोपीला दुहेरी फाशी व दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपीने हे माणुसकी व नात्याला काळीमा फासणारे कुकृत्य केले. त्या दिवशी संबंधित मुलीचे आई-वडील तिला गावातच राहणाऱ्या आजोबाकडे ठेवून मंदिरात महाप्रसादासाठी गेले होते. दरम्यान, शत्रुघ्न तिला आई-बाबा घरी आल्याचे सांगून सोबत घेऊन गेला. अर्ध्या तासाने आजोबा तिच्या घरी गेले असता ती घरी आली नसल्याचे कळले. जवळपास विचारपूस केली असता शत्रुघ्न तिला घेऊन अंगणवाडीकडे गेल्याचे समजले. वडील व आजोबाने अंगणवाडी गाठली असता तेथे ही चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. शत्रुघ्न तिच्या बाजूला पडलेला होता. चिमुकलीला बेशुद्धावस्थेत कुर्लीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पारवा पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, खून व लंैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. १२ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने वडील, आजोबा, डॉक्टर यांच्यासह १४ साक्षीदार तपासले. उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. टी.जी. बनसोड तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व अतिरिक्त सरकारी वकील मेहरोज पठाण यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)

Web Title: Keeping the double execution decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.