केम-आडका-खेडी मार्ग खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:27+5:302020-12-14T04:26:27+5:30
कामठी : तालुक्याातील कन्हान नदीवरील रेतीघाटातून राेज माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जाताे. या रेतीची ओव्हरलाेड वाहतूक परिसरातील ...
कामठी : तालुक्याातील कन्हान नदीवरील रेतीघाटातून राेज माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जाताे. या रेतीची ओव्हरलाेड वाहतूक परिसरातील मार्गाने केली जात असल्याने तालुक्यातील केम-आडका-टेमसना-खेडी हा मार्ग खड्डेमय झाला आहे. ताे पायी चालण्याच्या लायकीचा राहिला नसल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी तसेच रेतीची ओव्हरलाेड वाहतूक कायमची बंद करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
हा मार्ग जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. नजीकच्या कन्हान नदीवरील भामेवाडा व चिकना घाटातून राेज माेठ्या प्रमाणा रेतीचा उपसा केला जाताे. ती रेती दाेन वर्षांपासून केम-आडका-टेमसना-खेडी मार्गाने टिप्पर, ट्रक, ट्रॅक्टरने अव्याहतपणे वाहूल नेली जाते. ती वाहने ओव्हरलाेड असल्याने या मार्गाची खड्डे तयार हाेऊन ते माेठे हाेत गेल्याने दैनावस्था झाली आहे. विशेष म्हणजे, कन्हान नदीवरील भामेवाडा व चिकना या दाेन्ही रेतीघाटांचा लिलाव झाला नसताना त्यातून रेतीचा उपसा केला जात आहे.
राेडवर पडलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून, पावसाची सर काेसळल्यास या राेडला डबक्यांचे स्वरूप प्राप्त हाेते. त्या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना नागरिकांना कसरत करावी लागते. रेतीचा उपसा करणारे व वाहतूकदार कुणाचेही ऐकत नाही. प्रसंगी ते दादागिरी व भांडणे करीत असल्याने नागरिक त्यांना विचरणा करण्याची हिंमत करीत नाही. हा त्रास कमी करण्यासाठी या मार्गावरील रेतीची ओव्हरलाेड वाहतूक कायमची बंद करावी तसेच या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकूरवाळे, पंचायत समिती उपसभापती आशिष मल्लेवार, अतुल बाळबुद्धे, अनिकेत शहाणे, विजय खाेडके, अतुल डाेईफाेडे, वामन साबळे, नितेश सातनूरकर यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.