‘केरळ’ मदतीसाठी वायुसेनेच्या विमानाने साहित्य रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:26 PM2018-08-23T22:26:47+5:302018-08-23T22:27:41+5:30
भीषण पुरामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या केरळच्या नागरिकांसाठी गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर साहित्याची मदत करण्यात येत आहे. अनुरक्षण कमान मुख्यालय नागपूर येथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ही मदतसामुगी गुरुवारी सकाळी केरळसाठी रवाना करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीषण पुरामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या केरळच्या नागरिकांसाठी गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर साहित्याची मदत करण्यात येत आहे. अनुरक्षण कमान मुख्यालय नागपूर येथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ही मदतसामुगी गुरुवारी सकाळी केरळसाठी रवाना करण्यात आली.
अनुरक्षण कमान मुख्यालयाचे एअर आॅफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी स्वत: या अभियानाचे नेतृत्व केले. सकाळी १० वाजता नागपूर व विदर्भातून आलेली मदतसामुग्री वायुसेनेच्या सोनेगाव स्टेशनवर जमा करण्यात आली. यादरम्यान एअर मार्शल हेमंत शर्मा व वायुसेनेचे इतर अधिकाऱ्यांनी बनवण्यात आलेल्या कार्टनचे निरीक्षण केले. विमानात सामान ठेवून ते केरळसाठी रवाना करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांनी मोठ्या संख्येने मदत साहित्य पाठवले आहे. केरळच्या लोकांना नेमकी कोणत्या वस्तूंची सध्या गरज आहे, त्याची यादी जारी करण्यात आली होती. नागरिकांनी त्या वस्तू मदतीसाठी पोहोचत्या केल्या. यासोबतच आवश्यक औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंही पाठवण्यात आल्या आहेत.