केरळचा कळवळा, विदर्भातील शेतकºयांबाबत मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:52 AM2017-10-10T00:52:59+5:302017-10-10T00:53:14+5:30

शालेय पुस्तकांमध्ये ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’ ही म्हण अनेकदा वाचनात येते.

Kerala's tender, silence about farmers in Vidarbha | केरळचा कळवळा, विदर्भातील शेतकºयांबाबत मौन

केरळचा कळवळा, विदर्भातील शेतकºयांबाबत मौन

Next
ठळक मुद्देभाजप नेत्यांचे असेही समाजकारण : भाजपच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय पुस्तकांमध्ये ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’ ही म्हण अनेकदा वाचनात येते. मात्र राजकीय पटलावर ही म्हण कशी चपखलपणे बसते हे भाजपच्या शहर कार्यकारिणीतील नेत्यांनी दाखवून दिले. विदर्भात अपुºया पावसामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजाचे मनोबल कीटकनाशकांच्या फवारणीने झालेल्या शेतकरी मृत्यूंमुळे ढासळले आहे. शेतकºयांच्या या परिस्थितीबाबत मौन बाळगून असलेल्या भाजपच्या नेत्यांना हजारो किलोमीटर दूर असलेल्या केरळमधील भाजप कार्यकर्त्यांचा कळवळा आला. तेथील हत्यांचा निषेध करीत असताना आपल्या मातीतील शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना रस्त्यावर का उतरावेसे वाटले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. संघाने यासंदर्भात कधी नव्हे ती उघडपणे भूमिका घेतली. भाजपतर्फे केरळात जनरक्षा यात्रेची मोहीम राबविण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील याला उपस्थित होते. उपराजधानीपासून १५०० किलोमीटर अंतरावर केरळमधील सत्ताधाºयांकडून होणाºया या राजकीय हिंसेचा निषेध करण्यासाठी व जनरक्षा यात्रेच्या समर्थनार्थ शहर भाजपतर्फे सोमवारी दुपारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, महामंत्री संदीप जोशी, किशोर पलांदूरकर, संदीप जाधव, प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता, श्रीकांत देशपांडे, संजय बंगाले, धर्मपाल मेश्राम, इत्यादी नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. केरळ सरकारविरोधात यावेळी जोरजोराने नारे लावण्यात आले व जर हत्या थांबल्या नाहीत तर नागपुरातील भाजप कार्यकर्ते केरळमध्ये जाऊन शासनाला प्रत्युत्तर देतील, असे दावेदेखील करण्यात आले. हजारो किलोमीटरवर सुरू असलेल्या हिंसेला नागपुरातून जाऊन उत्तर देण्याची भाषा करणाºया नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचा मात्र विसर पडला होता. कीटकनाशकांच्या फवारणीने यवतमाळमध्ये झालेल्या जीवघेण्या घटनांचे लोण नागपूर जिल्ह्यातदेखील पसरले. जिल्ह्यातदेखील काही शेतकरी यामुळे आजारी पडले आहेत. सोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुºया पावसामुळे शेतकºयांना फटका बसला आहे. मात्र नागपूर शहरातील एकाही आमदाराने यासंदर्भात सरकारकडे मागणी केलेली नाही. इतकेच काय तर शेतकºयांच्या मृत्यूसंदर्भात सांत्वना देणारे साधे पत्रदेखील काढलेले नाही.
विदर्भातील शेतकºयांच्या मुद्यावर नेत्यांनी मौन बाळगल्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्तेदेखील अस्वस्थ झाले आहे. पक्षाने याबाबत पुढाकार घ्यायला हवा होता, असे मत एका पदाधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. दुसरीकडे संविधान चौकात जनसामान्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. केरळमधील हिंसा निषेधार्हच आहे. मात्र तेथील कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असताना भाजप नेत्यांना विदर्भातील शेतकºयांचे अश्रू दिसले नाहीत का, असे प्रश्न संविधान चौकात उपस्थित असलेल्या जनसामान्यांमधूनच उपस्थित झाले. यासंदर्भात शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Kerala's tender, silence about farmers in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.