राज्यव्यापी आंदाेलनात काटाेल तालुक्यातील काेतवाल सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:56+5:302021-08-14T04:12:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटोल : राज्यातील काेतवालांच्या विविध समस्या साेडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने राज्यव्यापी आंदाेलनाला सुरुवात केली आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटोल : राज्यातील काेतवालांच्या विविध समस्या साेडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने राज्यव्यापी आंदाेलनाला सुरुवात केली आहे. काटाेल तालुका काेतवाल संघटना या आंदाेलनात सहभागी झाली असून, पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय श्रीकांत उंबरकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविले.
काेतवालांना तलाठी भरती प्रक्रियेत ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून भरण्यात याव्या, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोतवालांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या वारसाची नियुक्ती करण्यात यावी, सेवानिवृत्तीनंतर कोतवालांना काेणताही शासकीय लाभ मिळत नसल्याने त्यांना सेवानिवृत्तीनंतर १० लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मागण्या मान्य न झाल्यास पुढे धरणे, निदर्शने, कामबंद आंदोलन, उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, सचिव शिवदास गजभिये, धनराज ढोके, देवीदास सोमकुवर, कवडू गोंडाणे, गणेश बोरकर, दीपक हिंगवे, जगदीश रक्षित, राहुल शेंडे, गोविंदा भारसाकरे, योगेश लांडे, योगेश्वर वैद्य, राजेंद्र सरोदे, पुरुषोत्तम पावडे, अरविंद गायकवाड, शंकर पडोलिया, सुखदेव वैद्य यांच्या समावेश हाेता.