‘खड्डे’पुराण कधी संपेल ?

By admin | Published: August 4, 2016 02:08 AM2016-08-04T02:08:19+5:302016-08-04T02:08:19+5:30

शहरातील उखडलेल्या रस्त्यासंदर्भात नागरिकांत प्रचंड असंतोष असल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चौकशी समिती

'Khade' supplement will end? | ‘खड्डे’पुराण कधी संपेल ?

‘खड्डे’पुराण कधी संपेल ?

Next

आता होणार झोननिहाय पाहणी : १४ दिवसानंतर मिळाला चौकशी ‘मार्ग’
नागपूर : शहरातील उखडलेल्या रस्त्यासंदर्भात नागरिकांत प्रचंड असंतोष असल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु घोषणा झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी बुधवारी स्थापत्य समितीच्या बैठकीत चौकशीची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यात दररोज एका झोनमधील रस्त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकशी समितीच्या सदस्यांनी झोनमधील उखडलेल्या रस्त्यांची पाहणी के ल्यानंतर याबाबतचा अहवाल तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी समितीचे सभापती सुनील अग्रवाल, मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
कालावधी कमी असल्याने पहिल्या टप्प्यात झोनमधील मुख्य रस्त्यांची पाहणी क रण्यात येईल. अंतर्गत रस्त्यांच्या चौकशीविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पाहणीचे काही निकष ठरविण्यात आले आहेत. परंतु याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.
२० जुलैला सर्वसाधारण सभेत महापौर प्रवीण दटके यांनी उखडलेल्या रस्त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वपक्षीय समिती गठित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार समितीने १५ दिवसांत आयुक्तांना अहवाल सादर करणे अपेक्षित होते. परंतु समितीला चौकशीची रूपरेषा ठरविण्यासाठी १४ दिवस लागले. पुढील सर्वसाधारण सभेपूर्वी चौकशी अहवाल सादर करावयाचा असल्याने समितीकडे मोजकाच कालावधी शिल्लक असल्याने अंतर्गत रस्त्यांची चौकशी तूर्त शक्य नसल्याचे समितीच्या एका सदस्याने सांगितले.
लक्ष्मीनगर झोनपासून चौकशीला सुरुवात करण्यात येईल. यात दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी ग्वाही समितीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी दिली.(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी-शिवसेना गप्प
समितीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सदस्यांचा समावेश करण्याचे निर्देश दटके यांनी दिले होते. परंतु अद्याप या पक्षाच्या सदस्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. परंतु दोन्ही पक्षाचे नगरसेवक यासंदर्भात गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 

Web Title: 'Khade' supplement will end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.