खाप्याचा लूक बदलतोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:17+5:302021-03-04T04:15:17+5:30
खापा : स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत खापा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम ...
खापा : स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत खापा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरात सार्वजनिक आणि खासगी जागावरील भिंतींची कलात्मक पद्धतीने रंगोटी करण्यात आली आहे. यासोबतच शहर स्वच्छ राखण्यासाठी जनजागृती संदेशाचे लिखाण करण्यात आले आहे. ओला व सुका कचरा विलीकरण, हागणदारीमुक्त शहर, प्लॅस्टिक वापरावर बंदी, जलसंवर्धनाबाबत नागरिकांची जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील मैदान, उद्यानांची स्वच्छता करून तिथे लहान मुलांसाठी खेळणी आणि ज्येष्ठांसाठी ग्रीन जीम उभारण्यात आले आहेत.
-
स्वच्छ व सुंदर शहरासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. खापा शहरातील नागरिकांकडून पालिकेच्या उपक्रमांना मोठा सहभाग मिळत आहे. हे कार्य निरंतर सुरू राहील.
- ऋचा धाबर्डे, मुख्याधिकारी, खापा, न.प.