मार्च २०१९ पासून धावणार खापरी ते बर्डी मेट्रो ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:08 AM2018-04-19T01:08:52+5:302018-04-19T01:09:04+5:30

खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या एटग्रेड (जमीन) सेक्शनचे काम पूर्ण झाले असून कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांनी जॉय राईडसाठी हिरवी झेंडी दिली आहे. आता नागपूरकरांचे लक्ष शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या इतर कामांवर केंद्रीत झाले आहे. याबाबत महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्र परिषद सांगितले की एटग्रेड सेक्शननंतर व्हाया काँग्रेसनगर सीताबर्डीपर्यंतचे मेट्रोचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होऊन खापरी ते बर्डी अशी मेट्रो धावायला लागेल.

Khapri to Buldi Metro Train will run from March 2019 | मार्च २०१९ पासून धावणार खापरी ते बर्डी मेट्रो ट्रेन

मार्च २०१९ पासून धावणार खापरी ते बर्डी मेट्रो ट्रेन

Next
ठळक मुद्देजॉय राईड लवकरच : एटग्रेड सेक्शनमध्ये सीएमआरएसने दिली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या एटग्रेड (जमीन) सेक्शनचे काम पूर्ण झाले असून कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांनी जॉय राईडसाठी हिरवी झेंडी दिली आहे. आता नागपूरकरांचे लक्ष शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या इतर कामांवर केंद्रीत झाले आहे. याबाबत महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्र परिषद सांगितले की एटग्रेड सेक्शननंतर व्हाया काँग्रेसनगर सीताबर्डीपर्यंतचे मेट्रोचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होऊन खापरी ते बर्डी अशी मेट्रो धावायला लागेल. ते पुढे म्हणाले, लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंतचे पाच मेट्रो स्टेशन, व्हाया डक्ट, ट्रॅक व अन्य संबंधित कामे डिसेंबर २०१८ पर्यंत आणि सुभाषनगर ते मुंजे चौकपर्यंतचे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल. बर्डी ते आॅटोमोटिव्ह चौक आणि बर्डी ते प्रजापतिनगरपर्यंतचे मेट्रो वर्क पूर्ण होण्याची तारीख सध्या सांगता येणार नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीत २०१९ पर्यंत मेट्रो प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले जाईल. वर्धा रोडवरील डबल डेकर ब्रिज डिसेंबर २०१८ पर्यंत तयार होईल. एटग्रेड सेक्शनमध्ये १६ एप्रिलला परीक्षण दौरा करून सीएमआरएस यांनी महामेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. या सेक्शनमध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट आणि एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनदरम्यान निमंत्रण आणि विनंतीच्या आधारे लवकरच जॉय राईड सुरू केली जाईल. सर्वात आधी २३ एप्रिलला हँडीकॅप्ड होम, अनाथालय आणि वृद्धाश्रमातील मंडळींना नि:शुल्क प्री-जॉय राईडचा आनंद लुटता येईल.

Web Title: Khapri to Buldi Metro Train will run from March 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.