खापरी रेल्वे-कलकुही ग्रामपंचायत भाजपाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:49 PM2020-01-10T22:49:18+5:302020-01-10T22:50:24+5:30

खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ पैकी सरपंचासह १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले आहे.

Khapri Railway-Kalkuhi Gram Panchayat to BJP | खापरी रेल्वे-कलकुही ग्रामपंचायत भाजपाकडे

खापरी रेल्वे-कलकुही ग्रामपंचायत भाजपाकडे

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंचासह १३ उमेदवार विजयी : काँग्रेस-शिवसेनेचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ पैकी सरपंचासह १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले आहे. येथे काँग्रेस आणि शिवसेनेचा दारुण पराभव झाला. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी या ग्रामपंचायतीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून मतदारांचे आभार मानले.
भाजपाचे शेखर उपरे, चंद्रकला चरडे, रिसका डुबडुबे, रेखा केशव सोनटक्के (सरपंच), गणेश बारई, प्रियंका थूल, सविता मसराम, प्रमोद डेहनकर,रंजना चाफले, प्रतिभा रोकडे, विनोद ठाकरे, शालिनी भुसे, सचिन मस्के हे उमेदवार विविध वॉर्डात विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तसेच बेसा खापरी रेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीत सुनिता नीलेश बुचुंडे या विजयी झाल्या आहेत.
खापरी कलकुही हे मिहान प्रकल्पात गेलेले गाव असून या दोन्ही गावांतील नागरिकांचे पुनर्वसन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिले. त्यामुळे जनतेने माजी पालकमंत्र्यांच्या विकास कामांंवर शिक्कामोर्तब केल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होते.
खापरी रेल्वे ही ग्रामपंचायत असतानाही या ग्रामंपचायतीवर भाजपचीच सत्ता होती. खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायत झाल्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक असून या निवडणुकीतही मतदारांनी काँग्रेसला नाकारले आहे.
माजी पालकमंत्री बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी गावात जाऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि.प. सदस्य रु पराव शिंगणे, केशव सोनटक्के उपस्थित होते.

Web Title: Khapri Railway-Kalkuhi Gram Panchayat to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.