पाच लाख सात हजार हेक्टरवर ‘खरीप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:18 AM2019-05-16T11:18:13+5:302019-05-16T11:21:59+5:30

येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे.

Kharip on 5 lakh 7 thousand hectares | पाच लाख सात हजार हेक्टरवर ‘खरीप’

पाच लाख सात हजार हेक्टरवर ‘खरीप’

Next
ठळक मुद्देकापसाचे क्षेत्र दोन लाखावर ९६४५३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे.
खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी जिल्ह्यात ९६४५३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यातील ३०१७६ क्विटंल बियाणे महाबीज व ६६२७७ क्विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. कापसासाठी ५०६३ क्विंटल, सोयाबीनसाठी ६३४५० क्विंटल, तूर ३१२० क्विंटल व भातासाठी २११५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तसेच १,४३,४५० मेट्रिक टन खतांची आवश्यकता भासणार आहे. यात ४८७५० मेट्रिक टन युरिया, डीएपी २००५० मेट्रिक टन, एसएसपी २५,८०० मेट्रिक टन, एमओपी ७३२० मेट्रिक टन व संयुक्त खते ४१५३० मेट्रिक टन लागणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची खरेदी परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी, खरेदी करताना पावती घ्यावी व ती संग्रही ठेवावी. तसेच पेरणीच्या वेळी पाकिटातील काही बियाणेही जतन करून ठेवावे. अनाधिकृत कापूस बियाणे व इतर पिकांचे अनाधिकृत बियाणे शेतकºयांनी खरेदी करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. सोयाबीनची पेरणी ७५ ते १०० मिमी पर्जन्यमान झाल्यावरच करावी. सर्वच पिकांच्या बियाण्यावर जंतू संवर्धकाचा वापर करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला. जिथे जमीन हलकी आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी कमी दिवसात होणारे पीक घेण्याचा सल्ला कृषी अधिकाºयांनी दिला.

Web Title: Kharip on 5 lakh 7 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती