नागपुरात खर्रा-सिगारेटची होतेय ब्लॅकमार्केटिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 06:54 PM2020-04-28T18:54:51+5:302020-04-28T18:55:55+5:30
कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
वर्धा महामार्गावरील पं. मालवीयनगर चौकात खर्रा व सिगारेटचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. जयप्रकाशनगर ते पांडे ले-आऊट दरम्यान पूर्वीच्या विज माता मंदिरापासून जाणाऱ्या जयताळा रोडवर हा प्रकार दिसून येत आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ भाजी-फळ विक्रेत्यांना ठेले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. दैनंदित अत्यावश्यक सेवेत येणाºया या सेवा नागरिकांची धावपळ होऊ नये म्हणून ही सुविधा शासनातर्फे मुक्त करण्यात आली आहे. मात्र, या सेवेच्या नावाखाली काही व्यावसायिक आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून येते. फळ व भाजी विके्रत्यांकडे हे व्यावसायिक खर्रा व सिगारेटचे पुडे ठेवत आहेत. पोलीस सहसा भाजीविके्रत्यांना व फळ विक्रेत्यांना जाब विचारत नसल्याचा हा गैरफायदा घेतला जात असल्याचे स्पष्ट होत आहेत. फळ आणि भाज्यांच्या ढिगाºयाखाली या वस्तू ठेऊन व्यसनाधिन व्यक्तीची ओळख झाली की त्यांना खर्रा व सिगारेट विकले जात आहे. जो खर्रा सामान्य काळात २० रुपयाला विकला जात होता, तोच खर्रा ४५ रुपयांना विकला जात आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे खर्रे १५० रुपयापर्यंत विकले जात आहेत तर सिगारेटची एक कांडी २५ ते ३० रुपयाला विकली जात आहे. विशेष म्हणजे, व्यसनाधिन माणसे सर्रास खरेदी करत आहेत आणि यामुळे लोक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येते. पोलीसांची गाडी दिसताच सर्वत्र शांतता असते. गाडी केली लगेच फळ व भाजीविके्रत्यांकडे एकामागून एक व्यसनी व्यक्ती खर्रा व सिगारेट खरेदी करण्यासाठी येत असल्याचे चित्र सकाळ ते संध्याकाळ दिसून येत आहे. केवळ नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी पोलीस यंत्रणा भर उन्हात आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, विके्रत्यांना त्यांच्या परीश्रमाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचा गोरखधंदा सोमवारी क्वार्टर, खरबी, वाठोडा, नंदनवन झोपडपट्टी, वर्धमाननगर, महाल या भागात फळ, भाजी विक्रेत्यांच्या व किरणा दुकानाच्या आळ केला जात आहे. याकडे प्रशासनाने विशेषत्त्वाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.