खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू 

By सुमेध वाघमार | Published: August 1, 2023 07:17 PM2023-08-01T19:17:24+5:302023-08-01T19:17:38+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खर्रा थुंकण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा नातेवाईकाचा पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

Kharra went to spit and was ambushed Incident at super specialty hospital, death after falling from third floor | खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू 

खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू 

googlenewsNext

नागपूर: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खर्रा थुंकण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा नातेवाईकाचा पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने  रुग्णालय परिसरात खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा येथील एक कुटुंब आपल्या रुग्णासह रविवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांना तेथील डॉक्टरांनी हृद्यरोग विभागात दाखविण्यासाठी रेफर केले होते. 

परंतु रविवार सुटीचा दिवस असल्याने व सोमवारी हृद्यरोग विभागाची ओपीडी राहत असल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकाला विनंती करून हॉस्पिटलमध्ये रात्र काढण्याची विनंती केली. माणुसकीच्या नात्याने रक्षकाने त्यांना तिसऱ्या मजल्यावर थांबण्यास सांगितले. मृत झालेल्या ५२ वर्षीय पुरुषाच्या पत्नीने अजनी पोलिसांना लिहून दिले की, सोमवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास पती खर्रा थुंकण्यासाठी गेला असताना त्यांचा पाय घसरला आणि खाली पडले. आम्ही आरडोओरड केल्यानंतर सुरक्षा रक्षक धावून आले. पती पोर्चच्यावरील सज्जावर पडून होते. रक्षकाने तेथील काच फोडून त्यांना बोहर काढले. त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्यावर त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Kharra went to spit and was ambushed Incident at super specialty hospital, death after falling from third floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.