नशेसाठी मित्राचेच केले अपहरण, अंतर्वस्त्रातील व्हिडीओही काढत केले ब्लॅकमेल

By योगेश पांडे | Published: October 14, 2024 04:34 PM2024-10-14T16:34:17+5:302024-10-14T18:56:43+5:30

Nagpur : मारहाण करत जीवे मारण्याची दिली धमकी

Kidnapped a friend to get drunk, blackmailed by taking videos of her underwear | नशेसाठी मित्राचेच केले अपहरण, अंतर्वस्त्रातील व्हिडीओही काढत केले ब्लॅकमेल

Kidnapped a friend to get drunk, blackmailed by taking videos of her underwear

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
उपराजधानीत नशेचे प्रमाण वाढत असून त्यातूनच अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. अशाच नशेखोर तरुणांकडून दारूच्या पैशांसाठी चक्क अल्पवयीन मित्राचेच अपहरण करण्यात आले. मित्राला निर्जन स्थळी नेत त्याचा अंतर्वस्त्रातील व्हिडीओ तयार करत त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खळबळजनक प्रकार घडला.

संबंधित अल्पवयीन मुलगा नरेंद्रनगर परिसरात राहतो. १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तो कुटुंबियांसोबत नरेंद्रनगरातील लक्षवेध मैदानात गरबा पाहण्यासाठी गेला होता. त्याचे कुटुंबीय घरी परतले व अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रांसोबतच तिथे थांबला होता. रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान त्याचे जुने मित्र हर्षल राजेश शाहू (१९, बाळकृष्णनगर), प्रयाग रविंद्र मेश्राम (१९, मुद्रानगर, मानेवाडा) व अल्पवयीन मुलगा यांनी त्याला बोलायचे आहे असे म्हणत एका कारजवळ नेले. एमएच ३१ सीपी ७८११ या क्रमांकाच्या कारमध्ये त्यांनी त्याला कोंबले व शंकरपूरजवळील पंडित हवेलीजवळ नेले. तेथे त्यांनी त्याला मारहाण केली व त्याच्या अंगावरील सगळे कपडे काढले. हर्षलने त्याचा अंतर्वस्त्रातील व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नशा करण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. त्यानंतर त्यांनी त्याला तिथेच ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळील तीन हजार रुपये आरोपींना दिले. तसेच एका मित्राला फोन करून आरोपींच्या फोन पेच्या स्कॅनरवर दोन हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी अल्पवयीन मुलाला त्याच अवस्थेत नरेंद्रनगर येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयाजवळ सोडले. त्याने घरी जाऊन कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली तर आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या हवाली केले.

वडिलांनादेखील जीवे मारण्याची धमकी
नरेंद्रनगरला आरोपींनी अल्पवयीन मुलाला परत सोडले. त्यावेळी जर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली तर तुझ्यासोबतच वडिलांनादेखील जीवे मारू अशी आरोपींनी धमकी दिली.

Web Title: Kidnapped a friend to get drunk, blackmailed by taking videos of her underwear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.