मैत्रिणीच्या भावाने केले अपहरण : दोन दिवस डांबून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:26 PM2020-10-01T20:26:59+5:302020-10-01T20:28:32+5:30

शाळकरी मुलीचे अपहरण करून तिला दोन दिवस अज्ञात ठिकाणी ठेवले आणि तिसऱ्या दिवशी सोडून दिले. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Kidnapped by friend's brother: Detained for two days | मैत्रिणीच्या भावाने केले अपहरण : दोन दिवस डांबून ठेवले

मैत्रिणीच्या भावाने केले अपहरण : दोन दिवस डांबून ठेवले

Next
ठळक मुद्देतहसीलमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळकरी मुलीचे अपहरण करून तिला दोन दिवस अज्ञात ठिकाणी ठेवले आणि तिसऱ्या दिवशी सोडून दिले. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
तक्रार करणारी मुलगी १४ वर्षांची असून नववीची विद्यार्थिनी आहे. तिला तिच्या आईने सोमवारी सायंकाळी दुसऱ्या एका महिलेचा मोबाईल नंबर आणण्यासाठी पाठविले. मुलगी तिच्या मैत्रिणीला घेऊन जात असताना तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी मोहम्मद अफाक ऊर्फ मोहम्मद सलमान तिला रस्त्यात दिसला. त्याने तक्रार करणाऱ्या मुलीला आपल्या गाडीत बसवले. गाडीत आधीच दोन मुले बसली होती. त्यानंतर सलमानने तिला रजनीगंधाची पुडी खायला दिली. तिला चक्कर आली. आरोपीने तिला २८ च्या सायंकाळपासून ३० तारखेच्या सायंकाळपर्यंत अज्ञात ठिकाणी ठेवले. नंतर बुधवारी सायंकाळी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोडून दिले. मुलगी तिसऱ्या दिवशी घरी पोहोचल्यानंतर तिच्या आईने तिला विचारले. त्यानंतर तिने दिलेल्या माहितीवरून तहसील पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद सलमान मोहम्मद इसराइल अन्सारी (वय २५) याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पीडित मुलीची मैत्रीण सोबत
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सलमान हा पीडित मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. घटनेच्या वेळी ती मुलगीसुद्धा पीडित मुलीसोबत होती, हे विशेष!

Web Title: Kidnapped by friend's brother: Detained for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.