नागपुरातील १० वर्षाच्या मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:47 PM2018-11-15T22:47:06+5:302018-11-15T22:48:19+5:30
गंगाजमुना वस्तीतील एका १० वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शिवम छबीराम कालखोर (वय १०) असे अपहृत बालकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगाजमुना वस्तीतील एका १० वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शिवम छबीराम कालखोर (वय १०) असे अपहृत बालकाचे नाव आहे.
रुमांश छबिराम कालखोरने (वय २३) लकडगंज पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, शिवम मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गंगाजमुना परिसरात होता. नंतर तो बेपत्ता झाला. विशेष म्हणजे, ज्या भागात तो राहतो त्या भागात वेश्या व्यवसाय चालतो. येथे ठिकठिकाणचे गुन्हेगार येतात. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराने त्याचे अपहरण केले असावे, असा संशय आहे. या संबंधाने वस्तीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.
पाचपावलीतील मुलगाही बेपत्ता
पाचपावलीतील राममंदिराजवळ राहणारे राजेश मारोतराव डोळसकर (वय ४५) यांचा १२ वर्षीय मुलगा बुधवारी दुपारी ४ वाजतापासून बेपत्ता झाला. तो त्याच्या मित्रांसोबत बुधवारी दुपारी खेळत होता. अचानक तो कुठे निघून गेला ते कळायला मार्ग नाही. राजेश डोळसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.
पाचपावली आणि एमआयडीसीतील अल्पवयीन मुली बेपत्ता
पाचपावली आणि एमआयडीसीतील अनुक्रमे १४ तसेच १६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. पाचपावलीतील मुलगी बुधवारी सकाळी बेपत्ता झाली तर एमआयडीसीतील मुलगी ९ नोव्हेंबरच्या सकाळी बेपत्ता झाली. पालकांनी दिलेल्या तक्रारीत फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बेपत्ता मुलींचा पोलीस शोध घेत आहेत.