अपहरण करून हत्येची धमकी, गुन्हेगारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 10:45 AM2022-04-04T10:45:58+5:302022-04-04T10:49:56+5:30

या क्लिपमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, त्या क्लिप ऐकता शहरात गँगवार होण्याची भीती वर्तविली जात आहे.

Kidnapping and death threats, audio clips of criminals go viral | अपहरण करून हत्येची धमकी, गुन्हेगारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल

अपहरण करून हत्येची धमकी, गुन्हेगारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हेगारी वर्तुळात प्रचंड धुसफुस गँगवॉर होण्याची भीती, शहरात खळबळ

नरेश डोंगरे

नागपूर : दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधील गुन्हेगार एकमेकांना अपहरण करून हत्या करण्याची धमकी देत असल्याच्या दोन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या क्लिपमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, त्या क्लिप ऐकता शहरात गँगवार होण्याची भीती वर्तविली जात आहे.

संबंधित वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणाची सुरुवात आठ दिवसांपूर्वी झाली आहे. हप्ता वसुली आणि अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगाराच्या एका टोळीने एका तरुणीला लॉजवर नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला बेदम मारहाणही केली. ही तरुणी मानकापुरातील एका गुन्हेगाराची प्रेयसी आहे. बलात्कारानंतरच्या मारहाणीत तिचे नाक फुटल्याने त्याने तिला विचारणा केली तेव्हा हा प्रकार तिने त्याला सांगितला. दुसऱ्या टोळीतील गुंडांनी प्रेयसीवर सामूहिक बलात्कार करून तिचे नाक फोडल्याचे कळाल्याने पित्त खवळलेला हा गुंड (जो स्वत:ला पांडे म्हणवून घेतो) ॲक्शन मोडवर आला. त्यानंतर ‘फोन वॉर’ सुरू झाले.

‘नंबरकारी’ला पहिला फोन

प्रियकर गुंडाने तरुणीला लॉजवर नेऊन कथित बलात्कार करून मारहाण करणाऱ्या गुंडाच्या एका नंबरकारीला (टोळीप्रमुखाचा खासमखास) फोन केला. या दोघांमध्ये तब्बल ६.१५ मिनिटे गरमागरमी झाली. फोन करणाऱ्या कथित पांडेने अनेक गुंडांची नावे यात घेतली. तुझ्या बॉसला आता परिणाम भोगण्यासाठी तयार राहण्यास सांग, असा इशाराही दिला.

त्यावर पलटवार करताना दुसरा फोन दत्ताभाऊ नामक गुन्हेगाराने पांडे नामक गुन्हेगाराला केला. १०.४६ मिनिटे या दोघांमध्ये वॉक्युद्ध झाले. अपहरणाची, जिवे मारण्याची धमकी अन् दर काही तासानंतर एकमेकांना अत्यंत घाणेरडी शिवीगाळ त्यांनी केली.

कमाल चाैक ते दगडी चाळ

गुंडांच्या या धमकीच्या संभाषणात एकाने मानकापूर, कमाल चाैकापासून तो दगडी चाळपर्यंतचा उल्लेख केला आहे. एकमेकांना बघून घेण्याची धमकी देतानाच आरोपींनी घाव, बंदुकीचाही शब्दप्रयोग केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे माहिती देऊन गांजा तस्करीचा धंदा बंद करण्याचीही धमकी दिली आहे. या दोन्ही क्लिप व्हायरल झाल्याने गुन्हेगारी वर्तुळातील धुसफूस समोर आली आहे. त्यांची भाषा पाहता ते दोघेही एकमेकांना धडा शिकविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठा गुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Kidnapping and death threats, audio clips of criminals go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.