नोकरीच्या नावावर मुलींचे अपहरण

By admin | Published: July 7, 2016 03:02 AM2016-07-07T03:02:33+5:302016-07-07T03:02:33+5:30

एका इव्हेंट कंपनीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसह दोन तरुणींचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली.

Kidnapping of girls in the name of job | नोकरीच्या नावावर मुलींचे अपहरण

नोकरीच्या नावावर मुलींचे अपहरण

Next

व्हेंट कंपनीत नोकरीचे आमिष : आरोपी मुलीही गायब
नागपूर : एका इव्हेंट कंपनीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसह दोन तरुणींचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली.
शांतिनगर येथील १७ आणि १९ वर्षीय मुलीची काजल बाराहाते रा. पाचपावली पोलीस चौकी आणि प्रियंका नावाच्या मुलीशी ओळख आहे. काजल आणि प्रियंकाने पीडित मुलींना चंद्रपुरात एका ‘इव्हेंट’चे काम असल्याचे सांगितले. त्यात काम असल्याचे आमिष दाखविले आणि सोबत चलण्यास सांगितले. बेरोजगार असल्याने दोन्ही मुली तयार झाल्या. त्यांनी घरच्यांनासुद्धा याची माहिती दिली. काजल आणि प्रियंकाने १ जुलैपर्यंत नागपुरात परत येण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे घरचे तयार झाले. २२ जून रोजी काजल व प्रियंकासोबत दोन्ही मुली गेल्या. १ जुलै रोजी मुली परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी काजल व प्रियंकाशी संपर्क साधला. परंतु त्या दोघीही समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाही. कुटुंबीयांनी मुलींसोबत बोलणे करून देण्यास सांगितले. तेव्हा दोघीही कुटुंबीयांना टाळू लागल्या. यानंतर शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच काजल व प्रियंका गायब झाल्या. त्यामुळे यात गुन्हेगारी कृत्य असल्याची शंका बळावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kidnapping of girls in the name of job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.