नागपुरातील बैद्यनाथ चौक भागात कुख्यात गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:12 AM2019-04-25T00:12:13+5:302019-04-25T00:17:01+5:30

इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बैद्यनाथ चौकात कुख्यात गुंड बादल गजभिये याची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३० वाजता घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा गँगवॉर भडकले असून परिसरात दहशत पसरली आहे.

The killing of a notorious goon in Badiyanath Chowk area in Nagpur | नागपुरातील बैद्यनाथ चौक भागात कुख्यात गुंडाची हत्या

नागपुरातील बैद्यनाथ चौक भागात कुख्यात गुंडाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देपुन्हा गँगवार भडकले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बैद्यनाथ चौकात कुख्यात गुंड बादल गजभिये याची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३० वाजता घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा गँगवॉर भडकले असून परिसरात दहशत पसरली आहे.
२७ वर्षीय बादलच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. इमामवाडा परिसरात त्याचा दबदबा होता. रात्री १०.३० वाजता बैद्यनाथ चौकातील कामगार भवनाच्या मागच्या बाजूला हल्लेखोरांनी बादलला घेरले. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले.
घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी गर्दी केली. पोलिसांनाही सूचना देण्यात आली. झोन-४चे डीसीपी रोशन राजतिलक आणि इमामवाडा पोलीस घटनस्थळी पोहोचले. पोलिसांनी बादलला मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना घटनास्थळी मिरची पावडर सापडली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. अनेक गुंडांसोबत बादलचे वैमनस्य होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपीची धरपकड करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०१५ मध्ये बादलचे वडील राजू यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी बादलने चुनाभट्टी भागात २०१६ मध्ये सौरभ अलोणी याच्यावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बदला म्हणून बादलची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे इमामवाडा-रामबाग परिसरात पुन्हा गँगवॉर भडकल्याचे बोलले जाते.
तासभर मृतदेह पडून
बैद्यनाथ चौकात खून करण्यात आला. लोकांनी गर्दी केली. येथून हाकेच्या अंतरावरच इमामवाडा पोलीस ठाणे आहे. परंतु पोलीस तासभर उशिरा पोहोचले. त्यामुळे तासभर मृतदेह तसाच पडून होता.

Web Title: The killing of a notorious goon in Badiyanath Chowk area in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.