मध्य प्रदेशात वाल्मिकी मुलांच्या हत्येचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:04 AM2019-10-05T00:04:39+5:302019-10-05T00:05:15+5:30

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात वाल्मिकी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधात  संविधान चौक येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले.

Killing of Valmiki youth in Madhya Pradesh protests | मध्य प्रदेशात वाल्मिकी मुलांच्या हत्येचा निषेध 

मध्य प्रदेशात वाल्मिकी मुलांच्या हत्येचा निषेध 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात वाल्मिकी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधात  संविधान चौक येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद तसेच सुदर्शन वाल्मिकी मखीयार समाज समन्वय समिती यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
एमपीच्या या गावात शौचास गेलेल्या या दोन मुलांची जातीय द्वेषातून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध दोन्ही संघटनांनी नोंदविला. आरोपींना अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, मृत मुलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मोबदला मिळावा आणि पीडित कुटुंबाला जमीन देण्यात यावी आदी मागण्या करणारे निवेदन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. या आंदोलनात जयसिंग कछवाहा, राजेश हाथीबेड, बाबुराव वामन, मेहरसिह मेहरोलिया, किशोर बिरला, सुनील तांबे, मोतीलाल जनवारे, शशी सारवान, रमेश मेहरोलिया, चमण हाडोती, प्रकाश चमके, अ‍ॅड. सागर गणवीर, अ‍ॅड विलास राऊत, विक्की बढेल, कुणाल पारोचे, सुखदेव शिव, मंजीत चव्हाण, चंद्रपाल सोनटक्के, चन्द्रकांत वानखेडे, शंकरराव वानखेडे, सतीश डागोर, सुनील जाधव, अविनाश डेलीकर, नरेश खरे, हरीश जानोरकर, पुरषोत्तम गायकवाड, चंदन चावरिया, राजू बरसे, रविराज सेवती, धनराज धडकार, प्रेमचंद मोगरे, राज हाडोती, राजू पत्ररोलिया, किशोर समुंद्रे आदी उपस्थित होते.

Web Title: Killing of Valmiki youth in Madhya Pradesh protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.