सुपारी देऊन केले जात होते खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:54+5:302021-09-25T04:07:54+5:30

जगदीश जोशी नागपूर : खुनाच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या उपराजधानीतील गुंड आता स्व:त खून करण्याऐवजी सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपींची ...

The killings were carried out with betel nuts | सुपारी देऊन केले जात होते खून

सुपारी देऊन केले जात होते खून

Next

जगदीश जोशी

नागपूर : खुनाच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या उपराजधानीतील गुंड आता स्व:त खून करण्याऐवजी सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपींची मदत घेत आहेत. यामुळे मागील १२ दिवसात सुपारी देऊन खून केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक घटना टळली असून गुन्हेगारांच्या या शैलीचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

सुपारी देऊन खून करण्याची पहिली घटना ४ सप्टेंबरला मानकापुरात घडविण्यात येणार होती. जुगार अड्डा चालविणाऱ्या कुख्यात सोहेल ऊर्फ गोलूवर चार वर्षांपूर्वी प्रतिस्पर्धी गुन्हेगाराने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गोलू न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याचा खून करू इच्छित होता. त्याने गुन्हेगार सलमान शेखला खुनाची सुपारी दिली. सलमानला त्याने दोन माऊजर, काडतूस आणि धारदार शस्त्र दिले. त्याला कार खरेदी करण्यासाठी ६० हजारही दिले. गोलू खुनानंतर ५ लाख रुपये देणार होता. योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी ४ सप्टेंबरला सलमान आपल्या साथीदारांसोबत मानकापूरच्या इनडोअर स्टेडियमजवळ आला. तो आपल्या टार्गेटची वाट पाहत होता. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक मंगला मोकासे यांना त्याच्या योजनेची माहिती मिळाली. मोकासे यांनी तेथे धाड टाकून सलमानचा साथीदार नावेद शेखला दोन माउजर, काडतूस आणि धारदार शस्त्रासह अटक केली. त्यानंतर सलमानलाही अटक करण्यात आली. त्याने सुपारी देऊन खून करणार असल्याची कबुली दिली. गोलू, त्याचा साथीदार शाहबाज ऊर्फ टिपू खान तसेच नीलेश बोंद्रे फरार असल्यामुळे या प्रकरणावरील पडदा उठलेला नाही. दुसरे सुपारी हत्याकांड १४ सप्टेंबरला महेश ऊर्फ गमछू लांबटचे झाले. गमछूच्या खुनात पीयुष ऊर्फ दद्या मालवंडे, लोकेश येडणे, वैभव बांते, गौरव रगडे, बिल्डर सुनील भगत आणि अश्विन साहूला अटक करण्यात आली आहे. गमछूचा खून जमिनीच्या वादातून किंवा सुभाष साहू हत्याकांडामुळे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. १० दिवसांपासून कोतवाली पोलीस तपास करीत आहेत. परंतु पोलीस कोणत्याही ठोस मुद्यावर पोहोचले नाहीत. सूत्रधार दद्या मालवंडेची शरीरयष्टी गमछूपुढे खूप कमी आहे. तो जवळपास दोन महिन्यांपासून गमछूचा खून करण्याची संधी शोधत होता. तो अजनीतून तडीपार गुंडाच्या संपर्कात होता. त्याची पोलिसांना माहिती मिळाली नाही. गमछू पोलिसांच्या नजीकचा होता. तिसरे प्रकरण आश्चर्यचकित करणारे आहे. यात प्रॉपर्टी डीलर प्रदीप बागडेचा त्याची पत्नी सीमानेच ३ लाख रुपयांची सुपारी देऊन खून केला. खून करणारा पवन चौधरी आणि त्याचा अल्पवयीन साथीदार चतुर नसल्यामुळे ग्रामीण पोलिसांनी काही तासातच या खुनाचा छडा लावून आरोपींना अटक केली. सीमाचे शहर पोलिसातील एका निरीक्षकाशी नाते असल्याची चर्चा असून या निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

............

Web Title: The killings were carried out with betel nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.