घाणीचे साम्राज्य, अंगणवाडीसेविका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:08 AM2021-02-09T04:08:49+5:302021-02-09T04:08:49+5:30
नागपूर : अंगणवाडीतील घाणीचे साम्राज्य आणि नोंदवही योग्य न ठेवल्याप्रकरणी कामठी तालुक्यातील खसाळा येथील अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात ...
नागपूर : अंगणवाडीतील घाणीचे साम्राज्य आणि नोंदवही योग्य न ठेवल्याप्रकरणी कामठी तालुक्यातील खसाळा येथील अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र पर्यवेक्षकावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, महिला व बाल विकास सभापती उज्ज्वला बोढारे हे एका कार्यक्रमासाठी कामठी मार्गावरून जात असताना, त्यांनी अचानक भिलगाव व खासाळा येथील अंगणवाडीला भेट दिली. त्यांना अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून आले. घाण वास येत होता. सामान्य माणूस पाच मिनिटे थांबू शकणार नाही अशी परिस्थिती होती. अंगणवाडीची स्थिती पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. यावरून जिल्हा परिषदेतील राजकारण तापले. जि.प.च्या बैठकीतही हा विषय गाजला. अंगणवाडीसेविकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.