किन्नर महामंडळाचा इशारा, परत लॉकडाऊन नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:24+5:302021-03-20T04:08:24+5:30

नागपूर - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला किन्नर विकास महामंडळातर्फे विरोध करण्यात आला आहे. जर पालकमंत्र्यांनी परत ...

Kinnar Mahamandal's warning, don't lock down again | किन्नर महामंडळाचा इशारा, परत लॉकडाऊन नको

किन्नर महामंडळाचा इशारा, परत लॉकडाऊन नको

Next

नागपूर - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला किन्नर विकास महामंडळातर्फे विरोध करण्यात आला आहे. जर पालकमंत्र्यांनी परत लॉकडाऊन लावला तर किन्नरांतर्फे बंदी झुगारण्यात येईल, असा इशारा महामंडळाच्या सदस्य राणी ढवळे यांनी दिला आहे.

लॉकडाऊनमुळे किन्नर समाजावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांचे तर घरभाडे थकलेले आहे. अशास्थितीत आता जायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे. उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आलेले नाही. हे माहीत असतानादेखील लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला तर आमचा त्याला विरोध असेल.

लाॅकडाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या आहेत. ऑनलाईन मद्यविक्री सुरू असून, चहाठेले व पानटपऱ्या बंद केल्या. दुचाकी आणि चारचाकी चालकांवर कारवाई होते. मग एसटी का बरे सुरू ठेवली. एसटीतून कोरोनाची लागण होत नाही काय, असा सवाल ढवळे यांनी केला. लाॅकडाऊन लावूनही कोरोनाच्या रूग्णात वाढ होत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन लावताना आमचादेखील विचार करावा, अशी मागणी ढवळे यांनी केली.

Web Title: Kinnar Mahamandal's warning, don't lock down again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.