ट्रेनमध्ये लुटमार करणाऱ्या किन्नरांना पोलीस कोठडी; घरझडती, रोख रक्कम जप्त

By नरेश डोंगरे | Published: January 5, 2024 08:48 PM2024-01-05T20:48:02+5:302024-01-05T20:48:15+5:30

फरार साथीदारांची शोधाशोध    

Kinyars who robbed trains in police custody; House raids, cash seized in nagpur | ट्रेनमध्ये लुटमार करणाऱ्या किन्नरांना पोलीस कोठडी; घरझडती, रोख रक्कम जप्त

ट्रेनमध्ये लुटमार करणाऱ्या किन्नरांना पोलीस कोठडी; घरझडती, रोख रक्कम जप्त

नागपूर : धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना मारहाण करून सिनेस्टाईल लुटमार करणाऱ्या दोन किन्नरांना चाैकशीसाठी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपींचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत.

अटकेतील आरोपी किन्नरांची नावे माया आणि सोनल आहे. त्यांनी आणि त्यांच्या चार साथीदारांनी बुधवारी मध्यरात्री पुणे हटिया एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये हैदोस घालून सिनेस्टाइल लुटमार केली होती. प्रत्येक प्रवाशांकडे दोनशे, पाचशे रुपये मिळावे म्हणून ते घाणेरड्या शिव्या घालत होते. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसेही हिसकावून घेत होते. बुटीबोरी-खापरी स्थानकापासून सुरू झालेला किन्नरांचा हा हैदोस नागपुरातील अजनी रेल्वे स्थानक येईपर्यंत सुरू होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती प्रवाशांनी अजनी स्थानक येताच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी राजेशकुमार शर्मा नामक प्रवाशाची तक्रार नोंदवून रेल्वे पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. त्यातील सोनल आणि मायाला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी १०३० रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यांच्या घरझडतीत या शिवाय फारसे काही मिळाले नसल्याचे रेल्वेच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांनी सांगितले. दरम्यान, माया आणि सोनलला आज न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांचा पीसीआर मंजूर केला. फरार असलेल्या अन्य चार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Kinyars who robbed trains in police custody; House raids, cash seized in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.