किशोर चौधरींची याचिका फेटाळली

By admin | Published: November 29, 2014 02:59 AM2014-11-29T02:59:08+5:302014-11-29T02:59:08+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी आमदार सुनील केदार यांना दिलासा देताना

Kishore Chaudhary's plea rejected | किशोर चौधरींची याचिका फेटाळली

किशोर चौधरींची याचिका फेटाळली

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी आमदार सुनील केदार यांना दिलासा देताना त्यांच्याविरुद्धची विधानसभा निवडणूक वादासंदर्भातील फौजदारी रिट याचिका फे टाळून लावली.
सावनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर चौधरी यांनी ही याचिका दाखल केली होती. या मतदारसंघात केदार काँग्रेसचे उमेदवार होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याचिकेवर निर्णय दिला. तथ्य वादग्रस्त असल्यामुळे प्रकरण रिट अधिकारक्षेत्रात ऐकता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवून याचिकाकर्त्यासाठी निवडणूक याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.
केदार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमक्ष सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली व बऱ्याच सत्य गोष्टी दडवून ठेवल्या असा चौधरी यांचा आरोप होता. केदार यांच्याविरुद्ध देशात विविध ठिकाणी फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे केदार यांना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५-ए अंतर्गत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १०० अंतर्गत केदार यांची निवडणूक रद्दबातल ठरविण्यात यावी, भादंविच्या कलम १९९ व २०० अंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात यावी व देशातील कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात यावे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. गजेंद्र सावजी, तर शासनातर्फे एपीपी तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Kishore Chaudhary's plea rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.