कोळी पार्कच्या प्रस्तावालाच कोळिष्टके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:05+5:302021-05-21T04:09:05+5:30

नागपूर : मेळघाटमध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून वनविभागाच्या प्राथमिक स्तरावर रेंगाळत आहे. मागील तीन वर्षांत दोन ...

Kolishtake the proposal of Koli Park | कोळी पार्कच्या प्रस्तावालाच कोळिष्टके

कोळी पार्कच्या प्रस्तावालाच कोळिष्टके

Next

नागपूर : मेळघाटमध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून वनविभागाच्या प्राथमिक स्तरावर रेंगाळत आहे. मागील तीन वर्षांत दोन वनमंत्र्यांच्या कानांवर हा प्रस्ताव टाकण्यात आला होता. मात्र त्याला गतीच मिळाली नाही. त्यामुळे कोळ्यांवर संशोधन करणारे डॉ. जी. एन. वानखेडे यांच्या पश्चात हे संशोधन अभ्यासात्मकदृष्ट्या जगासमोर कधी येणार, याची प्रतीक्षा वन्यजीव अभ्यासकांना लागून राहिली आहे.

कोळ्यांवरील संशोधन आणि अध्ययन हा दृष्टिकोन पुढे ठेवून मेळघाटामध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि नंतर संजय राठोड यांच्याशी स्थानिक पातळीवर चर्चा करून प्रस्तावही सोपविण्यात आला होता. अमरावती विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. एन. वानखेडे यांनी मध्य भारतामध्ये कोळ्यांच्या संदर्भात मोठे काम आणि संशोधन केले होते. या संशोधनादरम्यान अनेक प्रजातींच्या कोळ्यांचे संकलनही करण्यात आले होते. या विषयावर त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय सेमिनारही भरविले होते. त्यावर शोधप्रबंधही तयार आहेत. अमरावती जिल्ह्यातील वन्यजीव व आणि कीटक अभ्यासक अतुल बोडखे, यादवराव तरारे-पाटील, शिरभाते, आदींचा सहभाग होता.

...

चिखलदराच का ?

चिखलदरा येथील वन विभागाच्या वन प्रशिक्षण केंद्रामध्ये हे म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे डॉ. वानखेडे यांच्या कार्याला चालना मिळेल, असा यामागील हेतू होता. तसेच, चिखलदरा हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने देशविदेशांतील पर्यटक आणि अभ्यासक येतात. यामुळे हे कार्य सहजपणे अभ्यासकांपर्यंत पोहोचेल आणि संदर्भासाठी सोईचे होईल, अशी यामागील मध्यवर्ती संकल्पना होती. विद्यापीठाचेही या कामी सहकार्य घेण्याचे ठरले होते.

...

चिखलदरा येथे स्पायडर म्युझियम उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी दोन्ही मंत्र्यांकडे प्रस्ताव दिला असला तरी अद्याप गती आलेली नाही. आमचा पाठपुरावा सुरू आहे. राज्य वन्यजीव मंडळाचा सदस्य नात्याने पुढील बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडणार आहोत.

- यादव तरटे-पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

...

स्पायडर पार्क किंवा स्पायडर म्युझियमसाठी अद्याप वन मंत्रालयाकडे वन विभागाकडून प्रस्ताव आलेला नाही. यासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असू शकतात. तसा प्रस्ताव आल्यास सकारात्मक विचार केला जाईल.

- नितीन काकडोकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

Web Title: Kolishtake the proposal of Koli Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.