नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:14 AM2019-10-03T11:14:20+5:302019-10-03T11:16:56+5:30

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंगळवारी रात्री ८ वाजतापासूनच गर्दी वाढायला लागली. बुधवारी सकाळी ७.३० वाजतापासून गर्दीने उच्चांक गाठला.

Koradi Navratri festival in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक

नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक

Next
ठळक मुद्देव्हीआयपी दर्शन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढकोराडी मंदिर संस्थानचे उत्तम नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी सुटीचा दिवस असल्याने कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंगळवारी रात्री ८ वाजतापासूनच गर्दी वाढायला लागली. बुधवारी सकाळी ७.३० वाजतापासून गर्दीने उच्चांक गाठला. भाविकांच्या रांगेसाठी असलेले दोन्ही शामियाने दिवसभर हाऊसफुल्ल भरले होते. येथील सुरक्षेवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलीस विभागासह संस्थांनचे स्वयंसेवक लक्ष ठेवून आहेत.
काही सामाजिक संस्थानचे कार्यकर्तेही या सेवेत असल्याने कुठलाही गैरप्रकार दिसला नाही. पाच ते सहा लाख भाविकांनी बुधवारी मातेचे दर्शन घेतल्याचा अंदाज पोलीस विभागाचा आहे.

व्हीआयपी दर्शन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ
दोन वर्षांपासून कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानात ५०० रुपये देणगी शुल्क भरून सहपरिवार दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. व्हीआयपी मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू असल्याने, या कार्यात भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, हे महत्कार्य आहे. कोट्यवधीच्या कामात भाविकांचा हातभार लागावा, अशाप्रकारची विनंती संस्थान नेहमीच करीत आलेली आहे. त्यासाठी सर्व माध्यमांचा वापर केला जात आहे. आपल्या देणगीतून हे मंदिर भव्य स्वरूपात आकाराला जाईल अशाप्रकारची भावनिक विनंतीही करण्यात येत आहे. त्यामुळे ५०० रुपये देणगी शुल्क देऊन व्हीआयपी मार्गाने दर्शन घेणाºयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याचा फायदा संस्थानला जीर्णोद्धाराच्या कार्यात नक्कीच होईल, याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

लोककल्याण युवा मंचचे कार्य प्रशंसनीय
यात्रेतील व्हीआयपी दर्शन तसेच वृद्ध भाविकांना सांभाळण्याची जबाबदारी लोककल्याण युवा मंचच्या वतीने पार पाडली जात आहे. यासाठी युवा मंचचे अध्यक्ष लुकेश वºहोकर, रितेश मैंद, देवेंद्र माडे, निखील फुलझेले, राहुल वाटकर, कपिल वाटकर, आरिफ शेख, आशिष मुरडे, अतुल शेंडे, आकाश राऊत आदी तरुण परिश्रम घेत आहेत. यात्रेतील वृद्धांचे सुखकर दर्शन होईल, यासाठी ही मंडळी लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Koradi Navratri festival in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.