नागपूर जिल्ह्यात कोराडी नवरात्र उत्सव २९ सप्टेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:56 AM2019-08-30T11:56:06+5:302019-08-30T13:41:24+5:30
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण मध्य भारतातून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सुमारे १० लाख भाविकांसाठी सुरक्षेसह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने येत्या दहा दिवसात कामे पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिल्या.
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल प्रामुख्याने उपस्थित होते. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी अध्यक्ष अॅड. मुकेश शर्मा, उपाध्यक्ष अजय विजयवर्गी, सचिव केशवराव फुलझेले महाराज, सुशीला मंत्री, प्रेमलाल पटेल, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.
कोराडी देवस्थान येथे नवरात्रोत्सवाची २९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. या उत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी कोराडी संस्थानतर्फे आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. नवरात्रोत्सवामध्ये येणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करताना वाहन व्यवस्थासुद्धा पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावी. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार पुरेशी व्यवस्था आवश्यक आहे. याच परिसरात भाविकांसाठी मदत केंद्र, पोलीस चौकी सुरू करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी केल्या. भाविकांना दर्शनासाठी तीन प्रवेशद्वार राहणार आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. संपूर्ण परिसरात महाजेनकोतर्फे पथदिवे, पाच हायमॉस टॉवर आदी बसविण्यात येतील. याच परिसरात चोवीस तास आरोग्य पथक तैनात करण्यात येणार असून अॅब्युलन्सची सुविधा, भाविकांसाठी चोवीस तास पिण्याचे पाणी, परिसराच्या स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाºयांची नियुक्ती, शौचालय आदी सुविधा कोराडी ग्रामपंचायत, श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महाजेनको, महसूल विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने पूर्ण करण्यात येणार आहेत.