कोसळधार

By admin | Published: June 22, 2015 02:37 AM2015-06-22T02:37:03+5:302015-06-22T02:37:03+5:30

गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर अधून-मधून झालेल्या पावसाने सायंकाळनंतर मात्र थैमान घातले.

Kosaldar | कोसळधार

कोसळधार

Next

नागपूर : गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर अधून-मधून झालेल्या पावसाने सायंकाळनंतर मात्र थैमान घातले. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. त्यामुळे शहरातील मुख्य भागांसह सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. परिणामी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. रात्री ९.४० वाजेपर्यंत ४५.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान हवामान विभागाने अतिवृष्टीची शक्यता वर्तविली असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
गत पाच दिवसांपासून रोज धो धो पाऊ स पडत आहे. शिवाय शनिवारी रात्री शहरात धुंवाधार पाऊ स झाला. यामुळे स्थानिक प्रशासनाची पोलखोल झाली असून, शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी भरले होते. रविवारी त्यात आणखी भर पडली. शंकरनगर चौकासह पंचशील चौक, झांशी राणी चौक, धंतोली व व्हेरायटी चौक या शहारतील प्रमुख बाजारपेठेच्या चौकात पाण्याचे डबके तयार झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नवनिर्मित अपघात विभागासमोरच्या भागाला तलावाचे रुप आले होते. अपघात विभागात पाण्यातूनच ये-जा करण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातलगांना चांगलीच कसरत करावी लागली. दक्षिण नागपुरातील रामबाग, उत्तर नागपुरातील इंदोरा, मिसाळ-ले आऊट आदी सखल भागांतील वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.
हवामान विभागाने यापूर्वीच येत्या २५ जूनपर्यंत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या दरम्यान सुमारे २४४ मि.मी.पर्यंत पाऊ स कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष उपाययोजना सुरू करू न नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मोबाईल सेवेला फटका
संततधार पावसामुळ रविवारी मोबाईल सेवा ठप्प झाली होती. यामुळे मोबाईल ग्राहकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला. माहिती सूत्रानुसार केबल लाईनमध्ये पाणी शिरल्याने ही समस्या निर्माण झाली होती. यामुळे अनेक मोबाईलवरील कॉल ड्रॉप होत होते. शिवाय एक-दुसऱ्यांना आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता.
रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हाल
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफार्मवर पाणी जमा झाल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा उरली नसल्याचे चित्र होते.
एसटीत दक्षतेचा इशारा
हवामान खात्याने आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे आम्ही एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना संबंधित ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरासारखी परिस्थिती उद्भवल्यास दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक राजीव घाटोळे यांनी दिली.

Web Title: Kosaldar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.