महसूल कर्मचाºयांच्या आंदोलनात कोतवाल सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:44 AM2017-10-16T00:44:24+5:302017-10-16T00:44:34+5:30
महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने कर्मचाºयांनी शुक्रवारपासून (दि. १३) कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोतवाल महसूल विभागाचा एक घटक असल्याने नरखेड तालुका कोतवाल कर्मचारी संघाने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, तालुक्यातील कोतवाल या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
या प्रसंगी महसूल कर्मचारी संघटना आणि तालुका कोतवाल कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदार जयवंत पाटील यांना संयुक्तरीत्या निवेदन देण्यात आले. जोपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तोपर्यंत महसूल कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे. शिवाय, कोतवालांचाही या आंदोलनात सहभाग राहणार आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात ए. एम. मडावी, आर. एल. पवार, प्रमोद कदम, प्रवीण रामटेके, विजयकुमार सांगोळे, मनीष चवळे, पी. बी. शेरकर, आर. एन. नितनवरे, मुजीब शेख, कैलास जाधव, राजू ढोरे, कोतवाल संघटनेचे नरेंद्र पाटील, राजकुमार पंचभाई, प्रशांत कासे, संदीप सलामे, सागर कठाणे, दीपक रेवतकर, राहुल ढोणे, मुकेश पडधान, शंकर हल्लामडे यांच्या अन्य सदस्यांचा समावेश होता.