- तर ग्रामीण रुग्णालय सांभाळणार कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:29+5:302021-07-23T04:07:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास तसेच तिसरी लाट उद्भवल्यास या संकटाचा मुकाबला करण्यासाठी उमरेडच्या ग्रामीण ...

- The Kovid Center will run the rural hospital | - तर ग्रामीण रुग्णालय सांभाळणार कोविड सेंटर

- तर ग्रामीण रुग्णालय सांभाळणार कोविड सेंटर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास तसेच तिसरी लाट उद्भवल्यास या संकटाचा मुकाबला करण्यासाठी उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयातील चमू उपलब्ध असून जर तरची परिस्थिती ओढवल्यास रुग्णालय ही परिस्थिती हाताळणार आणि कोविड सेंटर सांभाळणार, असा शब्द जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर यांनी दिला. त्यांच्या या शब्दाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांनी दुजोरा दिला. कोविड सेंटर बंद झालेले नसून केवळ कंत्राटी मनुष्यबळास कार्यमुक्त करण्यात आल्याची बाबही दीपक सेलोकर यांनी स्पष्ट केली. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम, नायब तहसीलदार प्रदीप वरपे, डॉ. निशांत नाईक यांची उपस्थिती होती.

दरम्यान, चार दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट आणि समाधानकारक चर्चेअंती मागे घेण्यात आले. कोविड सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेता पुन्हा तिसरी लाट आल्यास सदर कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. सोबतच स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे ४० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर बेडची व्यवस्थासुद्धा करण्यात येत आहे, अशा स्वरूपाचे पत्र आंदोलनकर्त्यांना सोपविण्यात आले. आंदोलन मागे घेण्याची विनंती अधिकाऱ्यांनी केली. तासाभराच्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आनंद राऊत, विजयलक्ष्मी भदोरिया, दिलीप सोनटक्के, रोहित पारवे, डॉ. मुकेश मुदगल, राजेश बांदरे, देवानंद गवळी, सतीश चौधरी, प्रदीप चिंदमवार, बबलू लांडे, तुषार ढोरे, जितू गिरसावळे, रुमित राहाटे, विकास उराडे, कैलास ठाकरे, अमोल रायपूरकर, विशाल बेले, सुभाष गायकवाड, सागर दांडेकर, मोनल डाहाके, लक्ष्मण मिरे, स्वप्निल चौधरी, स्वप्निल फटिंग आदींची उपस्थिती होती.

Web Title: - The Kovid Center will run the rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.