मुळक आयुर्वेदिक कॉलेजमध्ये १०० खाटांचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:19+5:302021-04-21T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध काही. बेड उपलब्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध काही. बेड उपलब्ध करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे. भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिचर्स सेंटर के.डी.के. कॉलेज रुग्णालयात १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले जाणार आहे. यासाठी ऑक्सिजन लाईन टाकण्यात येणार आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी आयुर्वेदिक महाविद्यालय व पकवासा समन्वय रुग्णालयाचा दौरा केला. येथे १३६ खाटांचे रुग्णालय उघडण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले होते. मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय मध्ये ऑक्सिजनची १०० खाटांची व्यवस्था केली जाईल. यासाठी डॉक्टर, नर्सेसची व्यवस्था मनपा तर्फे करण्यात येणार आहे.