एनसीआयमध्ये १०० खाटांचे कोविड रुग्णालय ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:07 AM2021-04-16T04:07:43+5:302021-04-16T04:07:43+5:30
नागपूर : डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर येथे गुरुवारी १०० खाटांच्या ...
नागपूर : डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर येथे गुरुवारी १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. येथे येत्या काही दिवसातच आणखी १०० खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनी सुध्दा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या चार-पाच दिवसात स्थिती बऱ्यापैकी सुधारेल. सकाळीच आपण नागपूर महापालिकेतील स्थितीचा सुध्दा आढावा घेतला. ५०० बेड आणखी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होतो आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी अतिरिक्त साईट्सला मंजुरी दिली आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही सुविधा निर्माण केल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच आणखी विस्तार करण्याचा हितोपदेश केला. संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. आनंद पाठक, श्री. आनंद औरंगाबादकर यावेळी उपस्थित होते. खा. विकास महात्मे, आ. प्रवीण दटके, आ. परिणय फुके, महापौर दयाशंकर तिवारी यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.