तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:07+5:302021-03-05T04:09:07+5:30
जलालखेडा : कोविड लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट राेखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्या ...
जलालखेडा : कोविड लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट राेखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या प्रमाणात कोविड लसीकरणाला सुरुवात केली आहे. नरखेड तालुक्यातील जलालखेडा, मेंढला, सावरगाव या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत शुक्रवार (दि. ५ मार्च)पासून कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये ६० वर्षांवरील नागरिकांना तसेच ४५पेक्षा अधिक वय आणि मधुमेह, ब्लड प्रेशर असे आजार असणाऱ्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. परंतु आजार असलेल्या व्यक्तीकडे या आजारांबाबतची कागदपत्रे असणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाईल व त्यानंतर लगेच लसीकरण केले जाईल. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सभापती नीलिमा रेवतकर, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर यांनी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत माहिती घेतली. या वेळी डॉ. प्रशांत वैखंडे, वंदना ईश्वरकर, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.