मनपा केंद्रांमध्ये आज कोव्हिशिल्ड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:34+5:302021-07-16T04:07:34+5:30
लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व ...
लोकमत न्यूज् नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण महापालिकेसह शासकीय १४५ केन्द्रावर आज शुक्रवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या मनपा आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय व महाल येथील स्व.प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. केन्द्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोस दिला जाईल.