के.टी. नगर रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:20+5:302021-07-21T04:08:20+5:30

एनएसएससीडीसीएल व पर्सिस्टंट फाऊंडेशनचे मनपाला सहकार्य लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काटोल मार्गावरील महापालिकेच्या के.टी.नगर नागरी प्राथमिक ...

K.T. Oxygen Project in Municipal Hospital () | के.टी. नगर रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प ()

के.टी. नगर रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प ()

Next

एनएसएससीडीसीएल व पर्सिस्टंट फाऊंडेशनचे मनपाला सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काटोल मार्गावरील महापालिकेच्या के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा मंगळवारी शुभारंभ झाला. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसएससीडीसीएल) व पर्सिस्टंट फाऊंडेशन यांच्या समन्वयातून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.

महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. उपमहापौर मनिषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी महापौर मायाताई इवनाते, नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, हरीश ग्वालबंशी, आरोग्य समितीचे उपसभापती विक्रम ग्वालबंशी, नगरसेविका डॉ.परिणिता फुके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी डॉ. ग्रीष्मा धिंग्रा, एनएसएससीडीसीएल ई-गव्हर्नंस विभागाचे महाप्रबंधक डॉ. शील घुले, मुख्य नियोजक राहुल पांडे, पर्सिस्टंट फाऊंडेशनचे नागपूर सेंटर हेड रोहित भार्गव, नागपूर ॲडमिन योगेश करमरकर, सीएसआर समन्वयक अक्षिता व्यास आदी उपस्थित होते.

या प्रकल्पातून ५० खाटांच्या के.टी.नगर रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. सीएसआर निधीमधून पर्सिस्टंट फाऊंडेशनद्वारे पुढाकार घेऊन प्रकल्प उभारून दिल्याबद्दल राधाकृष्णन बी. यांनी आभार मानले. पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या सीएसआर समन्वयक अक्षिता व्यास यांनी प्रकल्पाच्या उभारणीची माहिती दिली. प्रकल्पातील मशीन्स या सिंगापूरवरून मागविण्यात आलेल्या असून यासाठी लागलेला सुमारे ४५ ते ५० लाख रुपये खर्च पर्सिस्टंटद्वारे उचलण्यात आलेला आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता २५० एलपीएम एवढी आहे.

Web Title: K.T. Oxygen Project in Municipal Hospital ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.