आंतरराष्ट्रीय महोत्सवात नागपूरच्या कुहूने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 01:16 AM2019-10-23T01:16:00+5:302019-10-23T01:17:18+5:30
प्राची व शुभेंदू चॅटर्जी यांची सहा वर्षीय चिमुकली कुहू चॅटर्जी हिने आंतरराष्ट्रीय महोत्सवात शास्त्रीयनृत्य शैली भरतनाट्यम्ची प्रस्तुती देत, सगळ्यांची मने जिंकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राची व शुभेंदू चॅटर्जी यांची सहा वर्षीय चिमुकली कुहू चॅटर्जी हिने आंतरराष्ट्रीय महोत्सवात शास्त्रीयनृत्य शैली भरतनाट्यम्ची प्रस्तुती देत, सगळ्यांची मने जिंकली.
भिलाई येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल कल्चरल हार्मनी प्रोग्रॅम - देश राग’मध्ये कुहूने तिसरे पारितोषिक प्राप्त केले आहे. एवढ्या चिमुकल्या वयात तिने दाखवलेल्या नृत्यकौशल्याने प्रशिक्षकही विस्मयित झाले. तिच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे तिला महोत्सवात तिसरे पारितोषिक प्राप्त झाले. यासोबतच, भिलाई येथेच पार पडलेल्या अखिल भारतीय संगीत, नृत्य स्पर्धा आणि नटवर गोपीक्रीष्णन नॅशनल अवॉर्ड २०१९ या सोहळ्यात तिने एकल नृत्य प्रकारात भरतनाट्यम्ची प्रस्तुती दिली. तिच्या नृत्यकौशल्याला भाळून या स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्टतेचे ‘सी’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कुहू चॅटर्जी ही सेवासदन सक्षम स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकते. तिला नृत्याचे अगदी सुरुवातीपासूनच वेड असून, तिची आवड बघता प्राची व शुभेंदू तिला शिल्पकला नृत्य मंदिर येथे भरतनाट्यम्चे धडे गिरवित आहे. नृत्य गुरू शिल्पा कापसे यांच्या मार्गदर्शनात अवघ्या सहाव्या वर्षीच तिने शास्त्रीय नृत्यात चांगली मजल मारली आहे.