मनपा विशेष समित्यांच्या सभापतिपदी कुकडे, दिवे, जाधव, झलके व मेश्राम यांची फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 09:22 PM2019-06-20T21:22:30+5:302019-06-20T21:26:23+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी १० विशेष समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरातील चांगल्या रिपोर्ट कार्डचा विचार करता पाच विद्यमान सभापतींची फेरनिवड करण्यात आली आहे. यात परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, करआकारणी व संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समितीचे अॅड.धरमपाल मेश्राम व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आदींचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी १० विशेष समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरातील चांगल्या रिपोर्ट कार्डचा विचार करता पाच विद्यमान सभापतींची फेरनिवड करण्यात आली आहे. यात परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, करआकारणी व संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समितीचे अॅड.धरमपाल मेश्राम व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आदींचा समावेश आहे.
आरोग्य समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. क्रीडा समिती सभापती म्हणून प्रमोद चिखले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी लक्ष्मी यादव, महिला व बालकल्याण सभापती संगीता गिऱ्हे, अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे तर स्थापत्य प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष समितीत प्रत्येकी नऊ सदस्य आहे. सभागृहातील संख्याबळानुसार यात भाजपा सहा, काँग्रेस दोन तर बसपाच्या एका सदस्यांचा समावेश राहणार आहे. सभागृहात भाजपा सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु काँग्रेस व बसपाकडून महापौरांना समित्यांसाठी सदस्यांची नावे न दिल्याने या पक्षांच्या सदस्यांची निवड पुढील सभागृहात केली जाणार आहे.
परिवहन समिती : सभापती बंटी कुकडे, उपसभापती राजेश घोडपागे, सदस्य रूपा रॉय,विशाखा बांते ,रूपाली ठाकूर व नागेश मानकर.
स्थापत्य प्रकल्प समिती : सभापती अभय गोटेकर,उपसभापती- किशोर वानखेडे,सदस्य विद्या मडावी,सोनाली कडू ,पल्लवी शामकुळे, ज्योती भिसीकर.
वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती: सभापती वीरेंद्र कुकरेजा,उपसभापती लहुकुमार बेहते ,नागेश सहारे, लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरिता कावरे.
विधी व सामान्य प्रशासन समिती: सभापती धर्मपाल मेश्राम ,उपसभापती मीनाक्षी तेलगोटे,जयश्री वाडीभस्मे,शकुंतला पारवे, सुमेधा देशपांडे, मनिषा धावडे.
शिक्षण समिती: सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, रिता मुळे, स्वाती आखतकर, सुषमा चौधरी व प्रमिला मथरानी.
गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समिती: सभापती लक्ष्मी यादव,उपसभापती उषा पॅलट, भाग्यश्री कानतोडे, अनिल गेंडरे, ऋतिका मसराम व प्रमोद कौरती.
क्रीडा समिती: सभापती प्रमोद चिखले, उपसभापती सुनील हिरणवार, सरला नायक, कांता रारोकर,नेहा वाघमारे व मनिषा कोठे.
महिला व बालकल्याण समिती : सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती विशाखा मोहोड, दिव्या धुरडे, मंगला खेकरे, मनिषा अतकरे व नसीम बानो.
जलप्रदाय समिती : सभापती विजय झलके,उपसभापती भगवान मेंढे, महेश महाजन, दीपक चौधरी, गोपीचंद कुमरे व जयश्री रारोकर.
कर आकारणी व कर संकलन समिती : सभापती संदीप जाधव, उपसभापती सुनील अग्रवाल, महेंद्र धनविजय, रेखा साकोरे,शिल्पा धोटे,उज्ज्वला शर्मा.
अग्निशमन व विद्युत विशेष समिती: सभापती संजय बालपांडे ,उपसभापती निशांत गांधी, वंदना भुरे ,वनिता दांडेकर ,संदीप गवई व भारती बुंडे.