पोटजातीत विखुरलेल्या कुणबी समाजाने एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 09:00 PM2020-02-04T21:00:51+5:302020-02-04T21:02:33+5:30
शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले. बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाचा विदर्भस्तरीय वधू-परिचय मेळावा नुकताच शंकरनगर येथील सभागृहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुरेश गुडधे पाटील, प्रमुख पाहुणे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, आ. समीर मेघे, आ. विकास ठाकरे ,माजी आ. सुधाकर कोहळे, उपमहापौर मनिषा कोठे, डॉ संजीव चौधरी, अखिल कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते सोयरीक या वधूवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुनील केदार, विकास ठाकरे, समीर मेघे आदींनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने मंत्री मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ संजीव चौधरी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी मान्यवरांच्या हस्ते मृण्मयी आवारी-बोबडे हिला राज्यस्तरीय मिसेस मेडिक्वीन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तिरळे कुणबी समाजातील ७२० मुलामुलींचा परिचय सोहळा पार पडला.
संचालन प्रदीप ठाकरे, प्रास्ताविक रमेशचंद्र ठवळे तर आभार सुभाष मानमोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाचे रवींद्र देशमुख, अवंतिका लेकुरवाळे, जानराव केदार, सुरेश लांबट, मनोहर ठवळे, नंदकिशोर गोहणे ,चक्रधर शहाणे ,वामनराव येवले, अशोक पांडव, राजेंद्र वानखेडे, नाना केने, श्रीधर नाहते, भाऊराव आमले, रमेश राऊत, जयंत राऊत, नरेश शेळके,रवींद्र गोतमारे,वनिता केदार, मंदा बोबडे, प्रणाली मानमोडे, वैशाली काळे, सोनाली काकडे पाटील, सुरेखा काकडे, मीना कुंटे,अंजली बाराहाते, कल्याणी ठाकरे, सीमा टालाटुूले ,मालती चोपडे आदींनी परिश्रम घेतले.