कुशच्या मारेकºयाची जेलमध्ये हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:49 AM2017-09-12T00:49:43+5:302017-09-12T00:51:59+5:30

बहुचर्चित कुश कटारिया हत्या प्रकरणातील सिद्धदोष आरोपी आयुष निर्मल पुगलिया (वय २७) याची मध्यवर्ती कारागृहात दुसºया एका कैद्याने निर्घृण हत्या केली.

Kush Marek jailed in jail | कुशच्या मारेकºयाची जेलमध्ये हत्या

कुशच्या मारेकºयाची जेलमध्ये हत्या

Next
ठळक मुद्देमध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांसमोर थरारफरशी डोक्यात घातली : गळा चिरला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित कुश कटारिया हत्या प्रकरणातील सिद्धदोष आरोपी आयुष निर्मल पुगलिया (वय २७) याची मध्यवर्ती कारागृहात दुसºया एका कैद्याने निर्घृण हत्या केली. सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या या भीषण हत्याकांडामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सूरज विशेषराव कोटनाके (वय २४) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो येथील मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे.
येथील सुरूची मसाल्याचे निर्माते प्रशांत कटारिया यांच्या कुश नामक चिमुकल्याचे पाच वर्षांपूर्वी अपहरण करून दोन कोटींच्या खंडणीसाठी आयुष पुगलिया याने कुशची निर्घृण हत्या केली होती. हे प्रकरण त्यावेळी राज्यभर गाजले होते. पोलिसांनी आरोपी आयुष पुगलियाला अटक केली होती. त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून नंतर त्याचा मोठा भाऊ नवीन आणि नितीन पुगलिया या दोघांनाही अटक केली होती. जनभावना लक्षात घेता सरकारने त्यावेळी या प्रकरणात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. कोर्टाने आरोपी आयुषला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर, त्याच्या दोन्ही भावांची मुक्तता केली होती. तेव्हापासून आयुष पुगलिया कारागृहात शिक्षा भोगत होता.
सोमवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे सर्व कैदी नैसर्गिक विधी आणि आंघोळीसाठी बराकीच्या बाहेर आले. छोटी गोल क्रमांक पाचच्या समोर आयुष पुगलिया शौचालयात गेला. त्याचवेळी आरोपी कोटनाके तेथे आला आणि त्याने आयुषच्या डोक्यात भलीमोठी फरशी (टाईल्स) घातली. एवढेच नव्हे तर कारागृहात वापरल्या जाणाºया चमच्याला घासून तयार केलेल्या सुºयाने आयुषचा गळा कापला. तो हे निर्घृण कृत्य करीत असताना आजूबाजूला अनेक कैदी होते. मात्र तो तडफडत असताना कुणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यान, कोटनाकेने बाजूला असलेल्या कारागृह रक्षकाला आवाज देऊन आयुष पुगलियाला ठार मारल्याचे सांगितले. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. कारागृहातील वरिष्ठ अधिकारी धावले. त्यांनी आयुषला कारागृहातीलच रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
खुनासाठी ‘कटनी’चा वापर
कारागृहामध्ये बंदीवान खान्या पिण्याचे साहित्याच्या कापणीसह इतर कामांसाठी ते ‘कटनी’ म्हणजे छोटा चाकू तयार करतात. कटनी तयार करण्यासाठी ताट व प्यालाचा उपयोग केला जातो. कटनीने फळांसह भाले भाज्या कापण्यासाठी सुरीचे काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सूरज व आयुषमध्ये वाद उद््भवत होता. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. सोमवारी सकाळी पुन्हा त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादात सूरजने आयुषवर कटनीने वार केले व डोक्यात फरशी मारून त्याची हत्या केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पाच तासानंतर हत्येची माहिती
सकाळी झालेल्या हत्येनंतर कारागृह प्रशासनाने आयुषच्या पत्ता असलेल्या नंदनवन ठाण्याला याबाबत माहिती दिली. मात्र, पुगोलिया यांचे वास्तव्य आता झिंगाबाई टाकळी, गोधनी परिसरात आहे. नंदनवन पोलिसांनी पुगलिया कुटुंबीयांना दुपारी १२. ०५ वाजता फोनद्वारे माहिती दिली. परंतु, प्रसारमाध्यमातून पुगलिया यांना सकाळी १०.३० वाजता बातमी मिळाल्याने त्यांनी कारागृहात धाव घेतली. मृत्यूला आठ तास होऊनही कारागृह प्रशासनाने कोणत्याही प्रकारची माहिती पुगलिया कुटुंबीयांना दिली नव्हती. दुपारी दीड वाजता कारागृहातून एक पत्रावर सही करण्यास पाठविले. मात्र, मृत्यूचे कारण व सद्य:स्थितीबाबत कर्मचाºयांनी सांगण्यास नकार दिला. आठ तासांपासून आयुषबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने व मृतदेह सुपूर्द न केल्याने संतप्त कुटुंबीयांनी कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला.
नियतीचे चक्र
कोणतेही कारण नसताना घराशेजारी राहणाºया चिमुकल्या कुशचे अपहरण करून आयुषने निर्घृण हत्या केली होती. अपहरण, हत्येच्या आरोपात अटक करून चौकशीनंतर पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले. तेव्हापासून तो कारागृहातच होता. त्याने निरागस, असहाय कुशची ११ आॅक्टोबरला हत्या केली होती. आधी त्याचे डोके विटांनी ठेचले आणि नंतर त्याचा गळा कापला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याच्या टाक्यात फेकला होता. कुशचा मृतदेह अनेक तास तसाच बेवारस पडून होता. त्याच्या नातेवाईकांना हत्या झाल्याचे अनेक तासानंतर कळले होते. आता सहा वर्षांनंतर तशीच असहायता, तशीच क्रूरता आयुषच्या वाट्याला आली. कुख्यात सूरज कोटनाकेने आधी आयुषचे डोके फरशीने ठेचले, त्यानंतर कटनीने त्याचा गळा कापला आणि मृतदेह शौचालयात तसाच टाकून दिला. अनेक तास तो मृतदेह बेवारस अवस्थेत तसाच पडून राहिला. सकाळी घटना घडून अन् नातेवाईक नागपुरात असूनही त्यांना अनेक तासानंतर माहिती मिळाली.

Web Title: Kush Marek jailed in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.