शेडवरून पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:12 AM2021-08-13T04:12:00+5:302021-08-13T04:12:00+5:30
बुटीबाेरी : शेडवरील जुने सिमेंट पत्रे बदलविण्याचे काम करीत असताना ३५ फुटावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका मजुराचा ...
बुटीबाेरी : शेडवरील जुने सिमेंट पत्रे बदलविण्याचे काम करीत असताना ३५ फुटावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महाबीज कंपनी गणेशपूर येथे मंगळवारी (दि.१०) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, मजुरांना काेणतीही सुरक्षेची साधने वा करार न करताच काम करण्यास सांगणाऱ्या दाेघांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे.
किशाेर रामकृष्ण हजारे (५२, रा. नेताजी वाॅर्ड, शिवाजी पुतळा, पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव असून, चाैकशी अहवालाअंती पाेलिसांनी त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आराेपी कंत्राटदार विजय जालिंधर थाेरात (४२, रा. शास्त्री वाॅर्ड, पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ) व प्रशांत व्यंकटराव गजभिये (४५, कनिष्ठ प्रक्रिया सहायक, महाबीज कंपनी, एमआयडीसी बुटीबाेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. कंत्राटदार व कंपनीचे कनिष्ठ प्रक्रिया सहायक यांनी कंपनीच्या शेडचे जुनी सिमेंट पत्रे बदलविण्याच्या कामासाठी काेणताही करार व सुरक्षेची साधने न देता मजूर अविनाश कुरसंगे, राजू पेंदाेर, त्रिशूलवार, किशाेर हजारे यांना ५० फुटाच्या शेडचे काम करण्यास सांगितले हाेते. दरम्यान, जुनी सिमेंट पत्रे बदलविण्याचे काम करीत असताना जुना सिमेंट पत्रा तुटल्याने किशाेर हजारे हा शेडवरून ३५ फुटावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. लगेच त्याला बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेले असता, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३०४ (अ), ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक दराडे करीत आहेत.