coronavirus; हमालांवर बेरोजगारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:47 AM2020-03-20T11:47:07+5:302020-03-20T11:47:26+5:30

नेहमी वर्दळ पहायला मिळणाऱ्या वर्धमाननगरातील लोहा बाजारात शांतता पसरली आहे. कोरोनामुळे लोडिंग-अनलोडिंग बंद करण्यात आल्यामुळे येथील हमाल व वाहन चालकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

labour Unemployment crisis | coronavirus; हमालांवर बेरोजगारीची वेळ

coronavirus; हमालांवर बेरोजगारीची वेळ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेहमी वर्दळ पहायला मिळणाऱ्या वर्धमाननगरातील लोहा बाजारात शांतता पसरली आहे. कोरोनामुळे लोडिंग-अनलोडिंग बंद करण्यात आल्यामुळे येथील हमाल व वाहन चालकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यांच्यापुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाहन चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अशी परिस्थिती कधीच ओढवली नाही. कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्यांच्यापेक्षा गरीब नागरिकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. काम नसल्यामुळे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास व्यापारी व कामगारांपुढील अडचणी पुन्हा वाढतील. हे कामधंद्याचे दिवस असताना मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने आवश्यक मदत करावी, अशी मागणी आहे.

Web Title: labour Unemployment crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.