लसीकरणात समन्वयाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:37+5:302021-03-21T04:08:37+5:30
मोबाइल अॅपवर नोंदणी, पण केंद्रावरून पाठवतात परत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण वाढत असल्याने लसीकरण मोहिमेला अधिक ...
मोबाइल अॅपवर नोंदणी, पण केंद्रावरून पाठवतात परत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण वाढत असल्याने लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मनपाचे पथक घरोघरी जाऊन ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांचा डाटा गोळा करत आहे. अॅपच्या माध्यमातून नोंदणी केली जात आहे. परंतु केंद्रावर गेल्यानंतरही त्यांची पुन्हा नोंदणी केली जात असल्याचे प्रकार पुढे येत आहेत.
महाल भागातील नागरिकांच्या घरी मनपाचे पथक पोहचले. ४५ वर्षांवरील नागरिकांची माहिती घेण्यात आली. संबंधित नागरिकांचे मोबाईल अॅपवर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ते प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्रात लसीकरणासाठी पोहोचले असता मनपा कर्मचारी अशा नोंदणीनुसार लसीकरणास नकार देतात. नागरिकांना पुन्हा नोंदणी करावी लागते. वास्तविक घरोघरी जाणाऱ्या पथकाकडून कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची मागणी केली जात नाही. परंतु लसीकरण केंद्रावर पोहचल्यानंतर गंभीर आजार असल्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले जाते. अशा स्वरूपाच्या अडचणीचा लोकांना सामना करावा लागत आहे.
....
खासगी लॅबच्या रिपोर्टमध्ये घोळ
खासगी लॅबचा कोविड रिपार्टसंदर्भात घोळ सुरू आहे. १८ वर्षीय फातिमा दाऊद हिने ध्रुव पॅथ लॅबमध्ये १९ मार्चला दुपारी १२.५२ च्या सुमारास आरटीपीसीआर टेस्ट साठी सॅम्पल दिले. १९ मार्चला सायंकाळी ४.५२ ला रिपोर्ट जारी करण्यात आली. यात ती पॉझिटिव्ह आली. रिपोर्टबाबत शंका असल्याने पुन्हा बाथो पॅथ लॅबमध्ये रात्री ९ वाजता तपासणी केली. २० मार्चला तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.