महिला शिक्षिकांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:27+5:302021-01-09T04:08:27+5:30
काटाेल : पंचायत समितीच्यावतीने काटाेल शहरात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. हा महिला शिक्षण दिन ...
काटाेल : पंचायत समितीच्यावतीने काटाेल शहरात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. हा महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात असल्याने काटाेल पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या व शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या २० शिक्षिकांचा गाैरव करण्यात आला.
पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या उपसभापती अनुराधा खराडे, पंचायत समिती सदस्य नीलिमा ठाकरे, निशिकांत नागमोते, संजय डांगोरे, अरुण उईके, चंदा देव्हारे, लता धारपुरे, खंडविकास अधिकारी विजय धापके उपस्थित होते. याप्रसंगी रजनी मानकर कोंढाळी, वैशाली बोरकर वंडली, बेबी रोडे पारडसिंगा, कल्पना देवतळे वाढोणा, रविदिनी जैवार अंबाडा, कविता थोटे खानगाव, वर्षा खळतकर मेटपांजरा, साधना चिखले डोरली, विजया वैद्य जामगड, ममता मेन मासोद, रेखा तिजारे पुसागोंदी, कल्पना धवड ढवळापूर, वंदना भोयर लिंगा, सिंधू काळे मूर्ती, नीलम दुपारे आजनगाव, शुभांगी उबाळे रिधोरा, वर्षा कोटमकर सोनोली, प्रमिला सोमकुवर काटोल, प्रतिभा वानखेडे गोंडीखापा, सरिता मडके सालई यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गाैरव करण्यात आला. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांनी केले. वनिता गोरे यांनी संचालन केले तर शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के यांनी आभार मानले.