साहित्याचा अभाव तरी ‘अव्वल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:38 AM2017-08-29T00:38:54+5:302017-08-29T00:41:11+5:30
ऋतुजा शेंडे आणि निकिता राऊत या स्टीपलचेसच्या खेळाडू. अॅथ्लेटिक्समधील हा अवघड प्रकार दोघींनी आव्हान म्हणून स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ऋतुजा शेंडे आणि निकिता राऊत या स्टीपलचेसच्या खेळाडू. अॅथ्लेटिक्समधील हा अवघड प्रकार दोघींनी आव्हान म्हणून स्वीकारला. या प्रकारात दोघीही राज्यात अव्वल स्थानावर आहेत. राष्टÑीय स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेशी साधने नसताना अडथळ्यांचे अग्निदिव्य पार करीत महाराष्टÑासाठी पदक जिंकण्यास दोघीही सज्ज आहेत.
ऋतुजा व निकिता रेशीमबाग मैदानावर सराव करतात. ट्रॅक स्टार अॅथ्लेटिक्स क्लबचे कोच रवींद्र टोंग त्यांच्यावर मेहनत घेत आहेत. पुण्यातील राज्य स्पर्धेत दोघींनी आपापल्या प्रकारात बाजी मारून आंतरराज्य स्पर्धेची पात्रता गाठली आहे. ऋतुजा दोन आणि तीन हजार तर निकिता तीन व पाच हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात धावते. यासाठी पाण्याचे अडथळे, हर्डल्स आणि ट्रॅक लागतो. नागपुरात अशी कुठलीही सुविधा नसताना या खेळाडू घडल्या. मैदानावर असलेल्या क्रिकेटपीचच्या रक्षणासाठी बांबूंचे अडथळे बांधले आहेत. त्या बांबू अडथळ्यांवर या मुली उड्या मारतात. हाच त्यांचा मोठ्या स्पर्धेसाठी सराव ठरतो. सकाळ-सायंकालीन सत्रात दोघीही सरावात व्यस्त असतात.
रेशीमबाग मैदान धार्मिक आयोजन आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे खराब झाले आहे. खेळाडूंच्या पायाला दुखापती होतील, इतकी अव्यवस्था पहायला मिळते. वर्षातून किमान आठ महिने मैदान इतर कार्यक्रमांसाठी बुक असल्याने खेळाडूंना इतरत्र आश्रय शोधावा लागतो. अशा स्थितीत तीन वर्षांपासून दोन्ही धावपटू तयारी करीत आहेत. बी.ए. प्रथम वर्षांला शिकणाºया ऋतुजा लकडगंजमध्ये तर निकिता वाठोड्यात राहते. आर्थिकस्थिती चांगली नसल्याने दोघीही सायकलने ये-जा करतात. आठवड्यातून एकदा पर्वताळ भागात धावण्याचा सराव मिळावा म्हणून सेमिनरी हिल्स भागातही त्यांचा धावण्याचा सराव चालतो. ऋतुजा डीएनसीत तर निकिता चक्रपाणी महाविद्यालयात शिकते. साहित्याची उणीव दूर करण्यासाठी महाविद्यालयाकडून काही प्रमाणात दोघींनाही मदत होत आहे.
ऋतुजाचे वडील दूधराम मनपात फायरमन तर निकिताचे वडील विजय लॉजमध्ये वेटर आहेत. मुलीच्या खेळातील प्रगतीचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. खेळात करियर घडवतील, असा विश्वासही आहे. राज्यस्तरावर सुवर्ण जिंकणाºया या मुलींना परिस्थितीची जाण असल्याने धावण्यासोबतच अभ्यासातही सातत्य राखून उत्कृष्ट मार्कस्सह बारावी उत्तीर्ण केले. राष्टÑीय स्तरावर छाप सोडून पुढे आशियाई आणि आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचाविण्याची इच्छा दोघींनीही व्यक्त केली आहे.