गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:02+5:302021-08-12T04:13:02+5:30
काटाेल : अखिल भारतीय लोधी लोधा अधिकारी-कर्मचारी संघ (आलोक) महाराष्ट्र राज्य तर्फे काटाेल शहरातील पंचवटी येथील सभागृहात कार्यक्रमाचे आयाेजन ...
काटाेल : अखिल भारतीय लोधी लोधा अधिकारी-कर्मचारी संघ (आलोक) महाराष्ट्र राज्य तर्फे काटाेल शहरातील पंचवटी येथील सभागृहात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात अतिथींच्या हस्ते काटाेल व नरखेड तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी आलोकचे प्रदेशाध्यक्ष अनंतलाल दमाहे हाेते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश सचिव गजानन मोरोलिया, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर दमाहे, रमेश बिरणवार, विजय बघेले, सुभाष नोरोलिया, राजू मुरोडिया, चंद्रशेखर खरपुरिया, वामन खजुरिया उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता दहावीतील यशस्वी खरपुरिया (९८.४० टक्के), यशस्वी चौधरी (९६.२० टक्के), प्राची खजुरिया (९१.८० टक्के), प्राची पडोलिया (९०.४० टक्के), तसेच इयत्ता बारावीतील ऋतुजा बासेवार (९२ टक्के), रेश्मा पडोलिया (९१.८५ टक्के), युक्ती मुरोडिया (९०.१६ टक्के), हर्षाली पेरोडिया (८९ टक्के), ईशाराणी खरपुरिया (८५.८९ टक्के), मोहीत खरपुरिया (८५.८३ टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गाैरव करण्यात आला. प्रताप खरपुरिया यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. संचालन एकनाथ खजुरिया यांनी केले, तर योगिता खरपुरिया यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी गणेश पेरोडिया, सुखदेव चौधरी, मोतीलाल खरपुरिया, ममता बासेवार, विजया खरपुरिया यांनी सहकार्य केले.