नागपूर शहरातील तलावात आॅक्सिजनची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:01 PM2018-10-10T22:01:10+5:302018-10-10T22:02:36+5:30

शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे.

Lack of oxygen in the lake in the city of Nagpur | नागपूर शहरातील तलावात आॅक्सिजनची कमतरता

नागपूर शहरातील तलावात आॅक्सिजनची कमतरता

Next
ठळक मुद्देफुटाळा तलावाची अवस्था गंभीर : विसर्जनानंतर तलावाची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे.
अमेरिकेची प्रसिद्ध पर्यावरण संस्था ‘अर्थ इको इंटरनॅशनल’ सोबत मिळून फाऊंडेशनने शहरातील तीन मुख्य तलावांवर निरीक्षण केले. अर्थ इको इंटरनॅशनल दरवर्षी जगभरातील नदी, तलावाचे पाणी गुणवत्ता व प्रदूषणावर पुस्तक प्रकाशित करते. यात १४६ देशांचा समावेश आहे. दरवर्षी ग्रीन व्हिजिल गणपती विसर्जनापूर्वी व विसर्जनानंतर शहरातील तलावाच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याचे निरीक्षण करते. त्यांनी केलेल्या निरीक्षणात फुटाळा तलावात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

 सोनेगावची स्थिती चांगली
फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेल्या निरीक्षणात सोनेगावची स्थिती चांगली आढळली आहे. कारण सोनेगाव तलावात यावर्षी विसर्जनास बंदी होती. त्यामुळे तलावातील पाण्यात डिजॉल्ड आॅक्सिजन, टर्बिडीटी आणि पीएचच्या पातळीत फार फरक आढळून आला नाही.
 गांधीसागरवर परिणाम
मनपाने विसर्जनासाठी बंदी घातल्यानंतरही गांधीसागर तलावात विसर्जन झाले आहे. त्याचा परिणाम तलावातील डिजॉल्ड आॅक्सिजन मात्रेवर पडला आहे. गणपती विसर्जनापूर्वी तलावातील डिजॉल्ड आॅक्सिजन ४.५ ते ५ मिलिग्राम होते. विसर्जनानंतर ते ४ ते ४.५ मिलिग्रामवर आले आहे. टर्बिडीटीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. फक्त पाण्याचा पीएच कायम आढळला आहे.
 फुटाळ्याला बसला फटका
विसर्जनाचा सर्वाधिक भार फुटाळा तलावावर असल्याने फुटाळ्याची प्रदूषणाची पातळी चांगलीच फुगली आहे. फुटाळा तलावात आॅक्सिजनच्या मात्रेत एक मिलिग्रामची घट दिसून आली आहे. टर्बिडीटीची मात्रासुद्धा १० जेटीयुने वाढली आहे. पाण्याचा पीएच ८ ते ८.५ दरम्यान आहे.
 तलावाच्या इको सिस्टमवर होतोय परिणाम
तलावातील पाण्यात आॅक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, त्याची सफाई लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. फुटाळ्यातील बंद पडलेले कारंजे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. डिजॉल्ड आॅक्सिजनची मात्रा दोन मिलिग्रामपर्यंत गेल्यास तलावाची इको सिस्टम बिघडू शकते.
कौस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

Web Title: Lack of oxygen in the lake in the city of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.